यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ७४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत २४ तासात जिल्ह्यात दोन कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून ६१ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.