Breaking

Post Top Ad

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

रेस्टॉरंट-बार ची वेळ वाढली

रेस्टॉरंट-बार ची वेळ वाढली

यवतमाळ : जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर ठिकाणी एफएल-३(परवानाकक्ष), एफएल-४ या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार सकाळी साडे दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी काल एका आदेशान्वये परवानगी दिली आहे. 

तथापि संबंधीत अनुज्ञप्तीधारकांनी शासनाचे अटी व मार्गदर्शक तत्वे पाळणे बंधनकारक राहील. तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालय यांच्याकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेसुद्धा बंधनकारक राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad