आर्णी(यवतमाळ) ओव्हरटॅक करण्याच्या नादात चारचाकी वाहनाने दुचाकीस्वार ला धडक दिल्याची घटना आर्णी येथील एचडीएफसी बॅक समोर आज शुक्रवार रोज सकाळी सव्वा दहा वाजता दरम्यान घडली.या घटनेत बांधकाम अभियंता तथा शासकीय कंत्राटदार सागर घोडेराव हे जखमी झाले.
आर्णी शहरात मुख्य रस्त्यावर संपुर्ण बाजारपेठ आहे.अशात बॅक आणि कार्यालय समोर वाहन पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने अनेक जण रस्त्यावर आपली वाहनाने उभी करता.त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडतात.मात्र सागर घोडेराव हे त्यांच्या दुचाकीने बस स्थानक कडे जात असताना मागु येणाऱ्या 'क्विड' या चारचाकी वाहनाने ओव्हरटॅक करण्याच्या नादात दुचाकी चालकाला धडक दिल्याने यात दुचाकीस्वार घोडेराव हे गंभीर जखमी झाले असून घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.दरम्यान चारचाकी वाहन पसार झाल्याची माहिती आहे.
