यवतमाळ-शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच यवतमाळ जिल्हा युवासेना विस्तारक पदाची मला जबाबदारी दिली आहे.यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे ना.संजय राठोड आहेत, तसेच जिल्ह्याला भावनाताई गवळी व हेमंत पाटील यांचे रूपाने दोन शिवसेना खासदार लाभले आहेत.
त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात युवासेना वाढीला भरपूर वाव आहे.कोणतेही गटातटांचे राजकारण न होऊ देता युवासेनेत काम करू इच्छिणाऱ्या योग्य युवकांना काम करण्याची संधी येत्या काळात युवासेना उपलब्ध करून देणार आहे.शिक्षण,आरोग्य आणि रोजगार ही युवासेनेचे त्रिसूत्री समोर ठेऊन युवासेनेचा यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर विस्तार करून तरुणांना आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आदर्श व्यासपीठ तयार करून देण्याचा मानस युवासेना विस्तारक दिलीप घुगे यांनी बोलून दाखवला आहे.
