Breaking

Post Top Ad

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

'कांदा निर्यातबंदी विरोधात शिवसेना आक्रमक'

 

'कांदा निर्यातबंदी विरोधात शिवसेना आक्रमक'

शेतकऱ्यांचा अवमान खपवून घेणार नाही;पालकमंत्री संजय राठोड यांचे स्पष्टीकरण 

यवतमाळ: कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे भाव पडण्याची भिती निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून आज या विरुध्द शिवसेना आक्रमक झाली आहे. यवतमाळ येथे शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत कांदा निर्यात बंदी हटविण्याची मागणी केली. 


केंद्र सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे राज्यासह देशातील शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा निर्यात बंदी केल्यामुळे भाव पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. विदेशात कांदा निर्यात केल्यास चांगला भाव मिळण्याची शक्यता असतांना केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी केली आहे. अशातच आता केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे आणून शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आज शिवसैनकांनी प्रचंड नारेबाजी केली. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले. 


याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेन्द्र गायकवाड, किशोर इंगळे उपजिल्हाप्रमुख, संजय रंगे तालुका प्रमुख, गजानन पाटील, गणेश आगरे, संजय कांबळे, राजु धोटे, संदीप सरोदे, पुरुषोत्तम राठोड, दिनेश चव्हाण, गोकुळ पवार, सुरेश राठोड, उध्दवराव साबळे,राजेन्द्र कोहरे, चेतन शिरसाट, पंकज देशमुख, दिपक सुकळकर, सचिन बावस्कर, शाकु शेख, शंकर देऊळकर, गोलु जोमादे, रुषी ईलमे, अतुल कुमटकर, राजु राऊत, जितेन्द्र उके, प्रजय मानकर, प्रेम राठोड, मेहरुलाल पवार, अभिजीत कावळे, शंकर कुळसंगे, संभलसिंग निर्मल, नांदीशेख घोसले, जामुसेट घोसले, अंजु घोसले, इलाबाद घोसले उपस्थित होते.  


पिककर्जासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचे निर्देश

राज्य सरकारने कर्जमाफी दिल्यानंतरही बॅंका शेतकऱ्यांना नविन पिककर्ज देत नसल्याच्या तसेच अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या अनेक तक्रारी शिवसेना पदाधिकाऱ्यांंना प्राप्त झाल्या आहे. दरम्यान शिवसेनेच्या तिन्ही जिल्हाप्रमुखांनी राज्याचे वनमंत्री तसेच जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब टाकली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देऊन वंचित शेतकऱ्यांना तात्काळ कर्जवाटप करण्यासाठी समंधीत बँक व्यवस्थापकांना निर्देश देण्याच्या सुचना दिल्या आहे. तसेच शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्यास खपवून घेणार नसल्याचे सुध्दा त्यांनी स्पष्ट केले आहे. 

मस्तवाल बँक अधिकाऱ्यांना वठणीवर आणू पराग पिंगळे,शिवसेना जिल्हाप्रमुख

लाखो रुपयांच्या शेतजमीनीचे कागदपत्र बॅंकेजवळ राहत असतांनाही शेतकऱ्यांना बॅंक अधिकारी अपमानास्पद वागणून देत आहे. या संदर्भातल्या अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्याने आम्ही पालकमंत्री संजय राठोड यांचेकडे हा विषय मांडला. प्रमुख्याने स्टेट बॅंकेचे अधिकारी शेतकऱ्यांना हिनतेने वागवित असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेच्या राज्यात शेतकऱ्यांचा हा अपमान थांबला नाही तर अपमानास्पद वागणून देणाऱ्या बॅंकांवर धडक देऊन अधिकाऱ्यांना  वठणीवर आणण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. 


शेतकरी संकटात असल्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्जाची रक्कम निरंक झाल्यानंतरही अनेक बॅंका शेतकऱ्यांना नविन कर्ज देण्यास तयार नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहे. विशेष म्हणजे जिल्हातील अनेक शेतकऱ्यांना बॅंका त्यांना अत्यंत हिनतेची तसेच अपमानास्पद वागणून देत असल्याच्या तक्रारी  शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांकडे केल्या आहे. एकीकडे राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असतांना बॅंका मात्र शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणून देत असल्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, विश्वास नांदेकर यांनी यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेतली. हा सर्व प्रकार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संजय राठोड यांना सांगितला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी सुध्दा प्रत्यक्ष पालकमंत्री  संजय राठोड यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात आणुन दिला. दरम्यान या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना  भ्रमणध्वनी वरुन शेतकऱ्यांना नविन पिककर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सुचना दिल्या. एवढेच नव्हे तर ज्या बॅंकांचे अधिकारी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणून देत असेल त्यांच्या वर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad