Breaking

Post Top Ad

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

'जिल्ह्यात एकाच दिवसात १६ कोरोना बाधितांचा मृत्यू'


'जिल्ह्यात एकाच दिवसात १६ कोरोना बाधितांचा मृत्यू'

यवतमाळ : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात तब्बल १६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून पुन्हा नव्याने १२६ रुग्णांची भर पडली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले १९० ‘पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह’ झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.


सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मृत्यू चा आकडा २२० पर्यंत पोहचला आहे.त्या अनुषंगाने नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःची आणि परिवाराची काळजी घेण्याची नितांत गरज आहे. कोरोना वरील लक्ष जो पर्यंत विकसित होत नाही, तो पर्यंत खबरदारी घेण्याची गरज आहे.


मृत झालेल्या १६ जणांमध्ये यवतमाळ शहरातील सात पुरुष यवतमाळ तालुक्यातील ५१ वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील दोन पुरुष, आर्णी शहरातील २ पुरुष, राळेगाव शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील ६१ वर्षीय महिला आणि पुसद शहरातील ६१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १२६ जणांमध्ये पुरुष ७० व महिला ५६ आहेत. यात आर्णी शहरातील सहा पुरुष व तीन महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक महिला, दिग्रस शहरातील पाच पुरुष व नऊ महिला, घाटंजी शहरातील एक पुरुष व एक महिला, जिल्ह्यातील एक महिला, महागाव शहरातील तीन महिला, मानोरा येथील एक पुरुष व एक महिला, नेर शहरातील दोन पुरुष, पांढरकवडा शहरातील पाच पुरुष व चार महिला, पुसद शहरातील १५ पुरुष व नऊ महिला, राळेगाव तालुक्यातील एक महिला, उमरखेड शहरातील ११ पुरुष व चार महिला, वणी शहरातील पाच पुरुष व दोन महिला, यवतमाळ शहरातील १८ पुरुष व १६ महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष व झरीजामणी शहरातील एक महिलेचा समावेश आहे. 


वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ५८६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ४५७ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७२८८ झाली आहे. यापैकी ६०२५ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २२० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २५६ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad