Breaking

Post Top Ad

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

'नरभक्षक वाघीण जेरबंद;पालकमंत्र्यांनी वनविभागाला दिले होते निर्देश'


'नरभक्षक वाघीण जेरबंद;पालकमंत्र्यांनी वनविभागाला दिले होते निर्देश'

गेल्या काही दिवसांपासून पांढरकवडा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या टिपेश्वर जंगलातील नरभक्षक 'वाघीणी'ने प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घालून मोठी दहशत निर्माण केली.त्यातच चार दिवसा पुर्वी शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला चढवून महिलेला ठार केले.त्या नंतर काही वेळातच चार बकऱ्यांची 'त्या वाघीणी'ने शिकार केली.त्यामुळे वाघीणाला पकडण्याची मागणी शेतकरी,शेतमजुर सह नागरिकांनी राज्याचे वनमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कडे करण्यात आली होती.


त्या अनुषंगाने दि.५ सप्टेंबर रोजी वनमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री संजय राठोड यांनी गावकऱ्यां सोबत बैठक सुध्दा घेतली होती.त्या दरम्यान 'त्या नरभक्षक वाघीणीला' जेरबंद करण्याचे निर्देश दिले वनमंत्री राठोड यांनी दिले  होते.

'वनमंत्र्यानी घेतली होती बैठक'
'नरभक्षक वाघीण जेरबंद;पालकमंत्र्यांनी वनविभागाला दिले होते निर्देश'


नरभक्षक वाघीणी चा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दि.५ सप्टेंबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहात कोपामांडवी,अंधारवाडी,टेंभी आणि पाटणबोरी येथील गावकऱ्यां सह वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनरक्षक एम.एस.रेड्डी,यवतमाळचे उपवनसंरक्षण केशव वाबळे,पांढरकवडा चे उपवनसंरक्षक सुभाष दुमारे आदी अधिकाऱ्यां सोबत बैठक घेवून तातडीने त्या नरभक्षक वाघीणीला जेरबंद करण्या संदर्भात निर्देश देण्यात आले होते.

'नरभक्षक वाघीण जेरबंद;पालकमंत्र्यांनी वनविभागाला दिले होते निर्देश'

मात्र दि.१९ सप्टेंबर रोजी पांढरकवडा तालुक्यातील अंधारवाडी-वाऱ्हा शेत शिवारात शेतात काम करणाऱ्या ६८ वर्षीय लक्ष्मी भीमराव दडांजे या महिलेवर वाघीणीने हल्ला चढवून ठार केल्याची घटना घडली होती.घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असताना आज दि.२३ सप्टेंबर रोजी अमरावती येथील टायगर फोर्स ने सकाळी दरम्यान 'त्या' नरभक्षक वाघीणीला जेरबंद केले.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वनमंत्री संजय राठोड यांचे आभार व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad