Breaking

Post Top Ad

रविवार, २० सप्टेंबर, २०२०

८३० जणांची कोरोना वर मात: तर नव्याने २२१ जण पाॅझिटिव्ह


८३० जणांची कोरोना वर मात: तर नव्याने २२१ जण पाॅझिटिव्ह

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा वाढत असला तरी बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतसुध्दा लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले ८३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही जिल्ह्यासाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे. तर जिल्ह्यात गत २४ तासात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून २२१ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. 


मृत झालेल्या नऊ जणांमध्ये यवतमाळ शहरातील ७० वर्षीय महिला आणि ७२ वर्षीय पुरुष, वणी शहरातील ५३ आणि ७० वर्षीय पुरुष, पुसद शहरातील ५० वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील ६० वर्षीय पुरुष आणि कळंब तालुक्यातील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर  नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या २२१ जणांमध्ये पुरुष १३७ आणि महिला ८४ आहेत. यात यवतमाळ शहरातील पुरुष ४६ व महिला ३० तसेच तालुक्यातील चार पुरुष, दारव्हा शहरातील नऊ पुरुष व चार महिला तसेच तालुक्यातील दोन पुरुष, वणी शहरातील चार पुरुष व तालुक्यातील दोन पुरुष, महागाव शहरातील सात पुरुष व चार महिला, पांढरकवडा शहरातील तीन पुरुष, दिग्रस शहरातील १० पुरुष व आठ महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील एक तसेच तालुक्यातील एक पुरुष, नेर शहरातील दोन पुरुष व पाच महिला तसेच तालुक्यातील एक महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील १४ पुरुष व आठ महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष, घाटंजी शहरातील सहा पुरुष व एक महिला, कळंब शहरातील सात पुरुष व तीन महिला, आर्णि शहरातील १० पुरुष व सात महिला तसेच तालुक्यातील दोन पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष व सहा महिला, मारेगाव शहरातील तीन पुरुष व तीन महिला पॉझेटिव्ह आले आहेत.


वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३९ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये ४७८ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७१५६ झाली आहे. यापैकी ५८३५ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २०४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २८६ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad