महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती नुकतीच घोषित करण्यात आली. विधानसभाध्यक्ष नानाभाऊ पटोले, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या.
महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांच्या सूचनेनुसार विदर्भात चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी रोशन पचारे, वर्धा जिल्ह्यासाठी प्रवीण उपासे, यवतमाळ येथे मनमोहन भोयर, बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी बाल गजानन अवचार, गडचिरोलीला वामनराव सावकडे, चंद्रपूर शहराध्यक्षपदी भालचंद्र दानव, तर वाशीम जिल्हाध्यक्षपदी राजकुमार दहात्रे यांची निवड करण्यात आली. किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र सोळंकी यांच्या स्वाक्षरीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध समस्यांविरोधात महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस सातत्याने लढत आहे. या निवडींमुळे हा लढा आणखी बळकट होईल अशी अपेक्षा किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग ) देवानंद पवार यांनी व्यक्त केली.
