आर्णी(यवतमाळ) तालुक्यातील जवळा येथील ३२ वर्षीय युवक दत्त टेकडी परिसरातील तळ्यात मासे पकडण्यासाठी गेला होता.दरम्यान तळ्यातील पाण्यात उतरल्या नंतर युवकाला अचानक फिट आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.२७ सप्टेंबर रोज रविवार ला सकाळी अकरा वाजता दरम्यान घडली.
तळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव किशोर अशोक नाने वय ३२ वर्ष रा.जवळ असे आहे.नागपूर-तुळजापुर राष्ट्रीय 'महामार्गा'साठी रस्ता बांधकाम करिता जवळा परिसरातील दत्त टेकडी जवळ ठिकठिकाणी गौण खनिजासाठी खड्डे पाडून ठेवण्यात आले आहे.त्यातच यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने 'त्या' खड्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.दरम्यान रस्ता बांधकामासाठी खोदलेल्या खड्यात मासे पकडण्यासाठी वडिल अशोक नाने सोबत मृतक किशोर थर्माकोलच्या बोटीवर बसून पाण्यात उतरला मात्र काही वेळात त्याला फिट आल्याने तो पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.
मृतकांचे वडिल अशोक नाने यांनी किशोर ला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले नाही,त्यामुळे मृतक किशोर याचा उशीरा पर्यंत मृतदेह मिळाला नाही.त्यामुळे यवतमाळ येथील आपत्ती व्यवस्थापन पथक घटना स्थळी दाखल झाले आणि मृतक 'किशोर'चा शोध घेत असताना पथकाला उशीरा पर्यंत मृतदेह चा शोध लागला नव्हता. यावेळी जवळ येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती.

