यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरात मुस्लीम समाजाच्या वतीने केवळ ५ लोकांनी बकरी ईद ची नमाज ईदगाह मध्येअदा केली.सर्वाना सुख शांती मिळावी यासाठी अल्ला कडे दुवा मागण्यात आली.
या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सगळी कडे चिंताजनक प्रस्थितीत निर्माण झाली आहे. अशात सामुहिक नमाज मुस्लीम समाज सह इतरांसाठी योग्य होणार नाही, त्या अनुषंगाने केवळ पाच मुस्लीम बांधवांनी 'लाॅकडाऊन'चे नियम पाळून बकरी ईदची नमाज अदा केली.
सर्वानी 'लॉकडाऊन'चे नियम पाळून संपूर्ण मुस्लिम बांधवानी घरी नमाज अदा केली व कब्रस्थानात केवळ पाच मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करून शासनाच्या नियमाचे पालन करण्यात आले,देशात आपात्कालीन स्थिती सुरू आहे कोरोना चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने देशात लॉकडाऊन सुरू केले आहे. याच प्रमाणे इदोज्जो हा म्हणजे बकरी ईद हा सण अत्यंत साध्या पद्धतीने मारेगाव येथील ईद गाह मध्ये पाच लोकांच्या उपस्थिती मध्ये ईद ची नमाज अदा करण्यात आली. मौलाना कलमुद्दीन यांनी कोरोना रोखण्या महामारी च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी विशेष प्रार्थना देखील केली.