Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

जिल्हात एकाच दिवशी १२१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

जिल्हात एकाच दिवशी १२१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
पुसद-५० दिग्रस-४४ पांढरकवडा-२० यवतमाळ-०६ दारव्हा-०१
यवतमाळ, दि. ३१ : जिल्ह्यात आतापर्यंत दुहेरी अंकात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी अचानाक तीन अंकात वाढली. ही आतापर्यंत एका दिवसात झालेली सर्वात मोठी वाढ आहे. आज (दि.३१) रोजी जिल्ह्यात तब्बल १२१ नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने  जिल्ह्यात हजारचा आकडा पार केला आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ३१ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १२१ जणांमध्ये ६६ पुरुष व ५५ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक ५० रुग्ण पुसदचे, ४४ रुग्ण दिग्रसचे, पांढरकवडा येथील २० रुग्ण, यवतमाळचे सहा तर एक रुग्ण दारव्हा येथील आहे. यात यवतमाळ शहरातील साईनाथ लेआऊट येथील एक महिला, यवतमाळ शहरातील पोलीस हेड क्वार्टर येथील एक पुरूष, तेलीपुरा येथील एक पुरुष, लक्ष्मीनगर येथील एक महिला, चिंतामणी नगरी वाघापूर येथील एक पुरूष, यवतमाळ शहरातील एक पुरूष, पुसद येथील द्वारका नगरीमधील दोन पुरूष, गांधी वार्ड येथील एक महिला, वार्ड नंबर एक मधील एक पुरूष व दोन महिला, रामनगर येथील एक पुरूष, पुसद शहरातील २३ पुरुष व २० महिला, दिग्रस येथील शास्त्री नगरातील एक महिला, गवळीपुरा येथील एक पुरूष, दिग्रस शहरातील २१ पुरूष व २१ महिला, दारव्हा शहरातील किला मजीद येथील एक महिला, पांढरकवडा येथील १३ पुरूष व सात महिला पॉझिटीव्ह आले आहेत. 

जिल्ह्यात गुरवारपर्यंत ३६१ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण होते. यात शुक्रवारी १२१ नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा ४८२ वर पोहचला. मात्र 'पॉझिटीव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या ३१ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४५१ आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १०७४ झाली आहे. यापैकी ५९६ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २७ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १०४ जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी ५३ नमुने तपासणीकरीता पाठविले. महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत १७१२३ नमुने पाठविले असून यापैकी १४२१८ प्राप्त तर २९०५ अप्राप्त आहेत. तसेच १३१४४ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad