दारव्हा(यवतमाळ) तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सांगलवाडी(लोही) येथे शुल्लक कारणावरून विधवा महिलेचा खून करून ठार केल्याची घटना घडली.दारव्हा पासून २० ते २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगलवाडी येथे एका विधवा महिलेचा शुल्लक कारणावरून डोक्यात कुऱ्हाडी मारून जिवाने ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
वैशाली रवी राठोड वय २७ वर्ष असे ठार झालेल्या मृतक विधवा महिलेचे नाव आहे. सांगलवाडी येथे नवऱ्याच्या मोठा भाऊ प्रविण राठोड याने मृतक वैशाली हिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सापासप वार केले.दरम्यान वैशाली जागीच रक्तबंबाळ होऊन खाली पडली.गावाचे पोलीस पाटील यांनी गंभीर जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी दारव्हा येथील उपजिल्हा रूग्णालयात नेत असताना दारव्हा शहरात तिचा मृत्यू झाला.
घटनेतील मृतक वैशाली हिचा नवऱ्याचा काही वर्षा आधी निधन झाल्याने 'ती' तीन चिमुकल्यांना घेऊन दिवस काढत होती.मात्र नवऱ्याच्या मोठ्या भावानेच सोमवारी दुपारी दरम्यान शुल्लक कारणावरून वाद करून विधवा महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. विधवा महिला व स्वतःची भावसून ला मारताना किमान त्याला तीन चिमुकल्यांचा विचार आरोपीच्या डोक्यात येऊ नये हे दुर्दैवच म्हणावं लागेल.वैशाली च्या मृत्यू नंतर त्या तीन चिमुकल्यांचा पालणपोषण कोण करणार अशा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
