मुंबई बदल केलेले वादग्रस्त विधानामुळे अडचणी वाढणार
राज्यांची राजधानी मुंबई या शहरात देशातील हजारो कलांवत येवून या ठिकाणी स्वतःचा करिअर घडवून संपती कमवता. ज्या कर्मभूमीच्या जोरावर आपली ओळख झाली, तिच्या भरोष्यावर देशासह समाजात आपली एक वेगळी ओळख झाली, मुंबईचे आभार व्यक्त करण्या ऐवजी मुंबई ला पाकिस्तान व्याप्ती काश्मीरशी करून मुंबई पोलिसांवर आरोप अभिनेत्री कंगणा राणावत हिने केल्याने याचे सर्वच क्षेत्रातून तीव्र प्रकाराचा निषेध व्यक्त केल्या जात आहे.
अभिनेत्री कंगणा राणावत हिने दि.३ सप्टेंबर रोजी मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्ती काश्मीरशी केली.तसेच कंगणाने मुंबई पोलिसांवर "माझा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे मुंबईत राहणे धोक्याचे आहे" अशा पद्धतीचे वादग्रस्त विधान टिव्ट वर केला होता. त्यामुळे राज्यात कंगणा विरोधात तीव्र रोष निर्माण झाला. अशात कंगणाने "मी दि.९ सप्टेंबर ला मुंबईत येत आहे, कोणाच्या बाप्पाला मी,भीत नाही, मला अडवून दाखवा" असे आवाहन दिल्याने शिवसेना सह सर्वच राजकीय पक्षाचे नेते कंगणा विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले.
आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेलं पत्र
कंगणा आणि शिवसेनेचा वादात केंद्र सरकारने अप्रत्यक्षपणे उडी घेऊन कंगणा राणावत ला 'वाय प्लस दर्जाची' सुरक्षा दिली. त्यामुळे हा वाद आखणी टोकाला गेला. त्यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दि.६ सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष यांना लेखी पत्र देऊन महाराष्ट्राची व प्रामुख्याने मुंबईची बदनामी करणाऱ्या कंगणा राणावत या अभिनेत्रीवर गृहखात्याने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केल्याने दि.८ सप्टेंबर रोजी याचे पडसाद अधिवेशनात उमटल्याचे दिसून आले.
खुद गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगणाच्या विधानांची चौकाशी करण्याचे आदेश दिले असून पोलिस कंगणा राणावत वर कोणत्या कलमा अंतर्गत कारवाई करता येते याचा विचार करित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कंगणा पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असून ड्रग्ज संदर्भात सुध्दा चौकशीचे आदेश गृहमंत्री देशमुख यांनी दिल्याने कंगणा राणावत यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहे. एकंदरीत कंगणा राणावत यांना मुंबई आणि मुंबई पोलिसांबदल केलेलं वादग्रस्त व्यक्तव्य अडचणीत आणणार हे सध्या तरी दिसतेय.

