Breaking

Post Top Ad

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

महामारीच्या संकटामध्ये "आशांची" निराशा


महामारीच्या संकटामध्ये "आशांची" निराशा

देवानंद जाधव। 98 81 139 126

यवतमाळ: दिवसेंदिवस कोरोना गगनाला गवसनी घालतो आहे. पाॅझिटिव निगेटीव्ह चा खेळ आजही जोमात आहे. अशाही निराशेच्या गर्तेत गावा-गावातील आशा कमरेला पदर खोचुन जनजागृती करत आहेत. समाजातील अंतीम टोकाच्या माणसांपर्यंत शासनाचा संदेश पोहचवत आहेत.


कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने उपलब्ध नसतांना देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून घरोघरी सर्वेक्षण करत आहेत. योग्य मार्गदर्शन करुन कोरोना सोबत दोन दोन हात करत आहे. खऱ्या अर्थाने आशा स्वयंसेविका, आणि गटप्रवर्तक आरोग्य दुत आणि कोरोना योद्धाची भूमिका ईमाने ईतबारे पार पाडत असतांनाच, त्यांचा ऐन मोक्याच्या वेळीच प्रलंबित मागण्या आणि मानधन रोखुन धरले आहे. त्यामुळे सर्वच आशा व गटप्रवर्तकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

 

राज्य शासनाने आशांना दोन हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना तिनहजार असे ठराविक मानधन देण्याचे, जुलै मध्ये मान्य केले. मात्र कुठे माशी शिंकली देव जाणे. ते मानधन अद्यापही त्यांच्या बॅंक खात्यावर जमा झाला नसल्याचा आरोप संघटनेनी केला आहे. कोरोना महामारीच्या संकटामध्ये एक हजार रुपये अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता मिळावा.एन ९५ मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, फेस शिल्ड, पिपिई किट, रेनकोट, आदी सुरक्षा विषयक साधने उपलब्ध व्हावीत.समुह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ही साधने 


मिळावित अशी माफक अपेक्षा संघटनेची आहे. सध्या परीस्थितीत सर्वच आशा आणि गटप्रवर्तकांची अवस्था फुटबॉल सारखी झाली आहे. ईकडुन तिकडुन डझनभर कर्मचारी त्यांना आदेश देत असतात. महीन्याभराचा भाजीपाला खरेदी करता येत नाही, ईतक्या तुटपुंज्या मानधनात त्यांना राब राब राबविले जात आहे. कोरोना सोबत लढतांना राज्यात अनेक ठिकाणी आशा आणि गटप्रवर्तक कोरोना विषाणुने बाधीत झाल्या आहेत. आजही सातत्याने होत असल्याचे दिसुन येत आहे. त्यांना वेळोवेळी प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी औषधीची मात्रा    ऊपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 


शिवाय वरिष्ठां कडुन त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याची तक्रार आहे. आशा आणि गटप्रवर्तकांना ई.एस.आय. ही मेडिक्लेम योजना लागु करुन  त्यांचा बंद केलेला दैनिक भत्ता पुर्ववत करण्याची मागणी आहे. अशा जिवन मरणाशी निगडीत मागण्यांसाठी आशा झगडत आहेत. मागण्यांचा सहानुभूती पुर्वक आणी गांभीर्याने विचार न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा, यवतमाळ जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे. निवेदनावर आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या ऊषा मुरखे, शालु मुरखे, दिपाली झोंबाडे, संगीता ढेरे, सविता बर्डे आदीच्या स्वाक्षर्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad