यवतमाळ : सध्या जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट होत आहे.दररोज शंभरीच्या वर पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आज दि.८ सप्टेंबर रोजी पुन्हा जिल्ह्यात नव्याने १५२ पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली असून पाच कोरानाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला.
दरम्यान आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ४२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृत झालेल्या पाच जणांमध्ये यवतमाळ शहरातील ५३ वर्षीय व ६० वर्षीय अशा दोन महिला, आर्णी शहरातील ६७ वर्षीय पुरूष, पांढरकवडा तालुक्यातील ४२ वर्षीय महिला व २४ वर्षीय पुरुष आहे. तसेच गत दिवसभरात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १५२ जणांमध्ये पुरुष ८८ असून यात महिला ६५ आहेत.
यवतमाळ शहरातील ३२ पुरुष व १८ महिला, वणी शहरातील सहा पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील चार पुरूष व तीन महिला, उमरखेड तालुक्यातील एक पुरूष व एक महिला, पुसद शहरातील दोन पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील सहा पुरुष व एक महिला, नेर शहरातील पाच पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील एक पुरूष व चार महिला, घाटंजी शहरातील दोन महिला व तालुक्यातील दोन महिला, दिग्रस शहरातील २० पुरुष व १५ महिला, दारव्हा शहरातील दोन पुरूष, दारव्हा तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील चार पुरूष व तीन महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष, आर्णी शहरातील दोन पुरूष व पाच महिला पॉझिटीव्ह आले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ९६० ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह असून होम आयसोलेशनमध्ये २७७ जण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४५४४ झाली आहे. यापैकी ३१८२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १२४ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २३४ जण भरती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response