शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा शेवटचा भाग आज सोमवारी प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी पंतप्रधान, प्रियंका गांधी, देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली आहेत. या मुलाखातीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तर देत खळबळ उडवून दिली आहे.
संजय राऊत- प्रियंका गांधी यांना राहत्या घरातून मोदी सरकारने बाहेर काढले. हा माणुसकीचाच पराभव आहे, असं नाही वाटतं?
शरद पवार- असं आहे की, सत्ता हातात असली तर ती विनयाने वापरायची असते. सत्तेचा दर्प जर का एकदा तुमच्या डोक्यात गेला की, मग अशा प्रकारच्या गोष्टी होतात. केवळ एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, जवाहरलाल नेहरू यांचे योगदान स्वातंत्र्य चळवळीत मोठे होते. लोकशाहीच्या मार्गाने देश नेण्याचा रस्ता आपल्याकडे त्यांनी वर्कआऊट केला हे योगदान आहेच. त्यांच्या कन्या इंदिरा गांधी यांनीही देशासाठी बलिदान दिले. इंदिराजींचे पुत्र राजीव गांधी यांनीही देशासाठी बलिदान दिले. देशासाठी बलिदान देणारे एक कुटुंबातील दोन लोक आणि त्याच्या आधीच्या पिढीने संपुर्ण आयुष्य देशासाठी दिले. अशा कुटुंबातील मुलगी म्हणजे प्रियंका. राजीव गांधींची हत्या झाल्या नंतर पुन्हा एकदा आपल्या पक्षाचे किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी सोनियाजी किंवा ती प्रयत्न करतेय.... ठीक आहे. एका माजी पंतप्रधानाच्या मुलीला दिलेलं घर तुम्ही काढून घेता आणि त्यांना आता कुठे तरी लखनौला जाऊन राहण्याची वेळ आली. मला स्वतःला सुसंस्कृतपणा वाटत नाही.
शिवसेनेला बरोबर घ्यायचं नाही, तुम्ही त्यात स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या, असे भाजपचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते. आमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एक - दोनदा बोलले. बोलले नाही हे खरे नाही, ते बोललेच.. एकदा नाही... दोनदा नाही... तीनदा बोलले... आणि त्याच्यामध्ये त्यांची अशी अपेक्षा होती की, प्राईम मिनिस्टरचे आणि माझे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळे प्राईम मिनिस्टरने यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी आणि म्हणुन माझ्या कानावरसुध्दा हा निरोप आला होता अशा गौप्यस्फोट शरद पवार यांनी शेवटच्या मुलाखातीत केला आहे.
संसद भवनात मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेम्बरमध्ये गेलो. त्यावेळी त्यांना आम्ही तुमच्याबरोबर महाराष्ट्रात सरकार बनवणार नाही, असे स्पष्टपणे सांगितलं. आम्ही जमल्यास शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू पण भाजप बरोबर सरकार बनवणार नाही, असे मी मोदींना स्पष्ट सांगितलं, असे सांगतानाच मी मोदींच्या चेंबरमध्ये गेलो, तेव्हा संसदेत माझ्यासोबत एक गृहस्थ बसलेले होते, ते म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. मोदींच्या चेम्बरमध्ये जात असल्याचे मी राऊतांना सांगून गेलो होतो. चेम्बरमधून बाहेर आलो तेव्हाही राऊत तिथेच होते आणि आल्यावर आतमध्ये काय झालं हे मी त्यांना सर्व सांगितलं, शरद पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत आहे, जी मी बघतोय ती आम्हा सगळ्यांच्या पेक्षा वेगळी आहे आणि त्याचं कारण उद्धव ठाकरे यांची कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये एकदा नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची. ही पद्धत अगदी लहानथोर सगळ्यांच्या मध्ये आहे. या विचाराने तो पक्ष चालला आणि यशस्वी सुध्दा झाला. सध्याचे मुख्यमंत्री त्याच पठडीतले आहेत व कामाची पद्धत तीच आहे. त्याबद्दल माझी काही तक्रार नाही असे शरद पवार यांनी सांगितले.
२०१९मध्ये राज्यात सत्तानाट्य सुरू असतानाच शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला त्यांच्या चेम्बरमध्ये गेले होते. त्यावर तर्कवितर्क लढवले गेले होते. आजही पवारांच्या त्या भेटीवरून तर्कवितर्क लढवले आज असतानाच पवारांनी या भेटीचा तपशील सांगून त्यावरून निर्माण झालेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवारांच्या घेतलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले. २०१९मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत होता. पण ऐनवेळी यूटर्न घेतला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, असं राऊत यांनी विचारलं. त्यावर पवारांनी तपशीलवार माहिती दिली. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायचं नाही. शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही. त्यामुळे स्थिर सरकार बनविण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या, असं भाजपचे काही नेते आमच्याशी बोलत होते. राष्ट्रवादीतील माझ्या सहकाऱ्यांशीही भाजपचे नेते बोलत होते आणि माझ्याशीही बोलत होते. भाजपचे नेते एकदा नाही, दोनदा नाही तर तीनदा माझ्याशी या विषयावर बोलले. पंतप्रधानांशी माझे संबंध चांगले असल्याने पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा म्हणजे मी संमती देईन, असं भाजप नेत्यांना वाटत होतं. ही गोष्ट माझ्या कानावर आली. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांकडे माझ्याबद्दल आणि माझ्या पक्षाबद्दल चुकीचं असं काही जाऊ नये म्हणून मीच पंतप्रधानांना त्यांच्या चेम्बरमध्ये भेटायला गेलो, असं पवारांनी सांगितलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response