Breaking

Post Top Ad

सोमवार, १३ जुलै, २०२०

आम्ही तोपर्यंतच सज्जन आहोत...!

आम्ही तोपर्यंतच सज्जन आहोत...!
जीवनात हिमालयाच्या उंचीपेक्षाही मोठी यशाची शिखरे ज्यांनी प्राप्त केली, कला साहित्य, विधी, विज्ञान, क्रीडा, संगीत, चित्रपट, राजकारण, समाजकारण,न्यायकारण अशा अगणित क्षेत्रात ज्यांनी जगात नाव कमावले आहे अशा अक्षरशः हजारो लोकांची वर्दळ मी आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पट्टपुर्ती येथील भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या दर्शनासाठी आलेली पाहिली आहे. राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील यांच्यापासून तर  एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पासून तर सभापती वि.स. पागे, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत, केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, शंकरराव चव्हाण, नितीन गडकरी, विश्व हिंदू परिषदेच्या अशोक सिंगल यांच्यापासून तर आंतरराष्ट्रीय कीर्तीख्यात  नानी पालखीवाला यांच्यापर्यंत, क्रीडा क्षेत्रात सुनील गावस्कर पासून तर सचिन तेंडुलकर पर्यंत, संगीतक्षेत्रातील सुब्बुलक्ष्मी पासून तर अनुप जलोटा आणि भीमसेन जोशी पर्यंत न्याय  क्षेेत्रातील टू माय फादर पुस्तक निघणाऱ्या न्यायमूर्ती उषा खास्तगिर, पासून तर विवेक गोगाक आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्यन्यायमूर्ती पी एन भगवती भगवती पर्यंत, पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्ही.आय. के.सरीन पासून तर ब्लिटझचे संपादक रुसी करंजिया ज्यांनी सत्यसाईबाबा यांच्यावर गॉड लिव्हज्ं ईन इंडिया हे पुस्तक लिहिलेले आहे.

जागतिक कीर्तीचे  साहित्यिक आणि सत्य साईबाबा यांचे सत्यम शिवम सुंदरम हे चरित्र लिहिणा-या एन. कस्तुरी पासून तर मॅन ऑफ मिरॅकल्स या पुस्तकातून जगाला सत्यसाईची ओळख करून देणा-या  मार्फेट  आणि हिस्लॉप यांच्यापर्यंत, असंख्य मुख्यमंत्र्यांपासून शेकडो मंत्र्यांपर्यंत तसेच सामाजिक क्षेत्रात काम केलेले निमिष पंड्या पासून रमेश सावंत यांच्यापर्यंत ज्यांचे लाखो लोक भक्त आणि अनुयायी आहेत. हे श्री सत्य साईबाब या सर्व लोकांना तुमचे कल्याण होवो हा आशीर्वाद देतात. सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, सर्वांना मदत करा कुणालाही दुखवू नका, सत्य हाच परमेश्वर आहे अशी शिकवण देतात, पाणी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात जगाला अचंबा वाटेल असू कार्य करणाऱ्या सत्यसाई बाबांच्या जवळ भ्रष्टाचार आणि कृष्णकृत्यांच्या सागरात आकंठ बुडालेले लोकही बाबांकडे यायचे, त्यांनाही बाबा जवळ करायचे तेव्हा अनेकांना गंभीर प्रश्न पडायचा तो असा की, बाबा जर परमेश्वराचे अवतार आहेत. शिर्डी साईबाबाचे अवतार आहेत, तर त्यांना हे असे सज्जन आणि दुर्जन यातील लोक ओळखता येत नाहीत काय?
प्रा.न.मा.जोशी
चैतन्य प्रेम यांचा हा लेख वाचल्यावर माझ्यासकट बहुतेकांना  हा प्रश्न पडेल की खरेच आपण सज्जन आहोत काय? आपण सज्जन आहोत असे आपण समजतो किंवा लोक तसे समजतात. स्वामी शिवानंद म्हणतात त्याप्रमाणे आपण सज्जन आहोत कारण आपले गैरकृत्य वा अपराध जोपर्यंत जग जाहीर झालेले नाहीत तोपर्यंत आपण सज्जन असतो. प्रत्येकाने आत्मचिंतन करण्यासारखा हा विषय आहे असेच म्हटले पाहिजे.
परमेश्वर अशा भ्रष्ट लोकांनाही तुमचे कल्याण होवो असा आशीर्वाद कसा काय देतात? मलाही असाच प्रश्न पडायचा. कारण मी स्वतः बाबांचा टीकाकार होतो पण आता मात्र बाबांच्या सर्वज्ञतेचा परिचय झाला आहे. त्यांच्या प्रशांति निलयम या आश्रमात जसा सज्जनांचा वावर तसाच दुर्जनांचाही वावर पाहून दुर्जनांवरही परमेश्वराची कृपा कशी काय बरसते हा प्रश्न नेहमी मनात उपस्थित व्हायचा. आश्चर्य असे की या प्रश्नाचे परफेक्ट उत्तर आता गवसल आहे. मनात येणारा प्रश्न हा प्रातिनिधिक स्वरूपाचा समजला पाहिजे. त्यासाठी हे उत्तर अतिशय महत्वाचे आहे. असे वाटते की, बाबांनी केलेली कामे, चमत्कार बाजूला ठेवले तरी, खूप-खूप महत्त्वाची आहेत. जगाला हेवा वाटेल इतकी अब्जावधी रुपये खर्च करून सत्यसाई बाबांनी उभारलेले भव्य आणि पूर्णतः मोफत उपचार करणारे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्स , शाळा कॉलेजेस , साडेसहाशे गावांना २४ तास मोफत पाणीपुरवठा इतकी प्रचंड  कामे पाहिली म्हणजे परमेश्वर शक्तीचा परिचय येतो. तर मुद्दा असा की, माझ्यासारख्या अनेकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर  लोकसत्ताच्या गुरुवार दिनांक ९ जुलै २०२० च्या अंकात स्वामी चैतन्य प्रेम चैतन्य प्रेम यांचा एकात्म योग या सदरात दया लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यातपांगरे येथील स्वामी शिवानंदाच्या चरित्रातला एक प्रसंग नमूद केला आहे. तो असा की भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या एका अधिकार्‍याकडून पुन्हा ते पाप न करण्याचं वचन घेऊन स्वामींनी संकट मुक्तीची ग्वाही दिली. 

या भ्रष्ट माणसाची पाठराखण देव कशी काय करू शकतो असा प्रश्न चरित्रलेखक श्रीधर आगाशे यांच्या मनात गुंजत होता. स्वामींनी त्यांची ही आंतरिक अस्वस्थता ओळखली. का रे गप्प का झालास ? या स्वामींच्या प्रश्नानं एखादा पूर्ण भरलेला फुगा चाचणीचा स्पर्श होताच फुटावा तसा तो राग प्रकट झाला .ते म्हणाले  " देव अशांचा कसा काय पाठीराखा होऊ शकतो? हा न्याय योग्य आहे का? आपण जे केलं ते योग्य होतं का? स्वामी म्हणाले ,दया दाखवणे ,देवाने त्याला क्षमा करणे योग्य नाही .हा सामाजिक गुन्हेगार आहे .याला शासन झालं पाहिजे असं तुला वाटतं ना? पण मग देवाने दया करायला योग्य कोण हे तरी सांगू शकशील का? किंवा तू स्वतःही कृपा योग्य आहात असं तुझं म्हणणं आहे का ?मग तू किंवा तुम्ही सर्वसाक्षी परमेश्वराला माहीत नाही असा कोणताही सामाजिक गुन्हा कधीही केलेला नाही असं म्हणू शकता का? अजून जगजाहीर झालेले नाहीत म्हणूनच तुम्ही सज्जन! तू किंवा तुम्ही काया वाचा मनोभावे करून कोणतेही अनैतिक गैरकृत्य केलेले नाही काय? मग परमेश्वराच्या दरबारात खरंतर तो अधिकारी आणि तुम्ही सारखेच. फक्त तू स्वतःला कृपापात्र मानतो ,त्याला नाही. अरे अधोगती हा निसर्ग धर्म आहे .त्यातून काही चांगलं निर्माण करायचं असेल तर त्याला शक्ती संचय सत्प्रवृत्ती ची जोड देऊन पश्चातापाने  पावित्र्य आणून त्याची आत्मिक उंची वाढवणे ,वरच्या स्तरावर त्याला नेणे हा त्यावर उपाय नाही का ?नाही तर वाल्याचा वाल्मीकी कधी होऊ शकला असता का? अधोगतीकडे जात असलेल्यांना आणखी एक धक्का देऊन अधिक खाली ढकलण्यासाठी तुमची कुणाची गरज नाही .जरुरी आहे ती वर येऊ इच्छिणार्‍यांना मदत करणाऱ्यांची. जरुरी आहे ती चांगलं घडावं असं वाटतं त्यांची आणि अशांना परमेश्वराने दया दाखवायची नाही, दुृष्टाला-सुृष्ट बनवायचा प्रयत्न करायचा नाही तर मदत कुणाला करायची? यातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वरी कृपेशिवाय मार्ग नाही अशी खात्री पटवून पश्चातापाने पुन्हा पाप  न करण्यासाठी तो प्रवृत्त झाला. परमेश्वराच्या दरबारात आला त्याच क्षणी तो दयेला पात्र झाला हे खरे ना?
लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत 8805948951

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad