Breaking

Post Top Ad

गुरुवार, २३ जुलै, २०२०

जिल्हात उद्या पासून संचार बंदी लागु होणार

जिल्हात उद्या पासून संचार बंदी लागु होणार

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यवतमाळ, पांढरकवडा, नेर व दारव्हा शहरात व या शहरालगतच्या भागात दिनांक २४  जुलै च्या मध्यरात्रीपासून ते ३१ जुलै २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत  संचारबंदी लागू केली आहे. यवतमाळ, पांढरवकडा, नेर आणि दारव्हा आणि या शहराच्या लगतच्या परिसरात २५ जुलै पासून संचारबंदी लागू होत असल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी उद्या दिनांक २४ जुलै रोजी (एकच दिवस) दुकाणे उघडी ठेवण्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी 5 पर्यंत राहणार आहे.
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यवतमाळ, पांढरवकडा, नेर आणि दारव्हा आणि या शहराच्या लगतच्या परिसरात २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तेव्हा या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी उद्या दिनांक २४ जुलै रोजी (एकच दिवस) जिवनावश्यक वस्तुंची व इतर सर्व  दुकाणे सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार असल्याची नोंद सर्व दुकान मालकांनी व नागरिकांनी घ्यावी असे निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.
संचारबंधीच्या कालावधीत पुढील बाबी, आस्थापना, व्यक्ती व समूहाला सुट राहील. यवतमाळ, पांढरकवडा, नेर व दारव्हा शहरातील व शहरालगतच्या क्षेत्रातील संपुर्ण अत्यावश्यक सेवेची व इतर सेवेची, वस्तुंची दुकाने व बाजारपेठ संपूर्णत: बंद राहतील. सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांचे औषधालये दररोज २४ तास चोवीस तास सुरू राहतील. ऑनलाईन औषध वितरण सेवा व शासकीय, खाजगी दवाखान्यालगत असलेली औषधीविक्री दुकाने २४ तास सुरू राहतील. तसेच इतर ठिकाणी असलेली एकल औषधी दुकाने सुद्धा सुरू राहतील.

प्रिंट मिडीया, ईलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वर्तमानपत्र वितरक यांना घरपोच वर्तमानपत्रक वाटपासाठी मुभा राहील. आठवडी बाजार, भाजीमंडी, फळ मार्केट बंद राहील. भाजीपाला व फळे गल्ली, कॉलनी, सोसायटी मध्ये जाऊन विक्री करण्यास सकाळी ७ ते दुपारी १२ ह्या वेळेत मुभा राहील. एका ठीकाणी बसून विक्री करता येणार नाही. दुध संकलन व दुध विक्री तसेच फिरते दुध विक्री सकाळी ७ ते सकाळी १० पर्यंत मुभा राहील. तसेच फिरते दुध विक्री ह्या बाबीस सायंकाळी ७ ते रात्री ८ ह्या वेळेत सुद्धा मुभा राहील. सर्व केश कर्तनालय, सलुन, ब्युटी पार्लर दुकाने संपुर्णत: बंद राहतील. पेट्रोल, डिझेल पंप अत्यावश्यक सेवेकरिता २४ तास सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेतील पोलीस, आरोग्य विभाग, इतर शासकीय विभागाची वाहने, कार्यरत शासकीय कर्मचारी यांची वाहने, अत्यावश्यक सेवा पुरविणारी घरगुती गॅस वितरक, पिण्याचे पाणी पुरविणारे इ. खाजगी आस्थापने यांनाच इंधन पुरवठा करता येईल. तथापि तेथील कर्मचारी यांनी गणवेष व ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील. घरगुती गॅस फक्त घरपोच वितरण करण्यास  सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत वितरण करण्यास मुभा देण्यात येत आहे. परंतु गॅस वितरक कर्मचारी यांनी गणवेश व ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

कृषी साहित्य, रासायनिक खतविक्री, बी-बियाणे विक्री व वाहतुक त्यांचे गोदामे व दुकाने सकाळी ७ ते दुपारी १२ या कालावधीत चालू राहतील. शेतीची पेरणी, मशागतीस व संपुर्ण शेतीच्या कामास मुभा राहील.स्वस्त धान्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहतील तथापि त्याठीकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहील. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बँका त्यांचे बँकींग कामे करण्याकरिता तसेच बँकेचे कर्मचारी हे त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करू शकतील. त्याव्यतिरिक्त बँकेत शासकीय कार्यालयाचे बँकेशी निगडीत शासकीय व्यवहार चालू राहतील. इतर कोणत्याही ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध राहील. परंतू ए.टी.एम. रोज २४ तास सुरू राहतील व ए.टी.एम. मध्ये पूरेसे पैसे उपलब्ध राहतील ह्याची संबंधीत बँकांनी खात्री करावी. शासकीय व खाजगी बांधकामे बंद राहतील. तथापि ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल तरच त्यांना काम सुरू ठेवता येईल. सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी संपुर्णत: बंद राहतील. टु व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर, बंद राहतील तथापि अत्यावश्यक सेवेतील वाहने, पुर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर अनुज्ञेय राहील. चिकन, मटन, अंडी, मासे मार्केट व विक्री बंद राहील. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल, (कोविड-१९ करिता वापरात असलेले वगळून), उपाहारगृह, लॉज, रिसॉर्ट, मॉल, बंद राहतील. जेवणाची घरपोच पार्सल सुविधा बंद राहील. सर्व दारुची दुकाने बंद राहतील. मंगल कार्यालये, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपुर्णत: बंद राहतील. या आदेशानुसर लागू करण्यात येत असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह अनुज्ञेय राहील. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला नियमानुसार परवानगी राहील. जार वॉटर सप्लायर्स यांना सामाजिक अंतराचे पालन करत सकाळी ७ ते १२ या वेळेत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. इलेक्ट्रीशियन्स, प्लंबर इत्यादींना घरी जाऊन ईलेक्ट्रीशियन्स, प्लंबींगचे काम करण्यास मुभा राहील. क्रीडा कॉम्पलेक्स आणि स्टेडीयम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्यायामाकरीता, मॉर्निंग वॉक, सायकलींग करिता सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत मुभा राहील.

संपुर्ण यवतमाळ जिल्ह्यात राज्य, केंद्र शासनाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजिटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधीत मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्यावश्यक सेवा तसे कृषी, बी-बीयाणे, खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्नीशमन सेवा, जलनि:सारण तसेच पूर्वपावसाळी व पावसाळ्याच्या दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे, वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तसेच प्रतिबंधीत क्षेत्राकरिता नियुक्त कर्मचारी यांनाच चार चाकी, दुचाकी (स्वत:करीता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:चे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वत:चे आधारकार्ड सोबत ठेवावे. वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल.

यवतमाळ जिल्ह्यातील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती आणि जोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा शिवाय घराबाहेर जाता येणार नाही. तसेच कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. याशिवाय कोणतीही व्यक्ती पायी अथवा सायकलवर अथवा चारचाकी अथवा दोन चाकी वाहन घेवून फिरणार नाही, अन्यथा त्यांचे वाहन जप्त करण्यात येईल व वाहन परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सदर आदेश यवतमाळ, पांढरवकडा, नेर व दारव्हा शहरात व या शहरालगतच्या भागास लागू राहतील. तसेच पुसद व दिग्रस शहरास दिनांक २० जुलै रोजी लागू केलेले संचारबंदी आदेश कायम राहतील. यवतमाळ जिल्ह्यातील वरील शहर वगळता उर्वरित नगरपरिषद व ग्रामीण भागात १४ जुलै चे आदेशानुसार मुभा देण्यात आलेल्या बाबी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच मुभा देण्यात आलेल्या वेळेत सुरू राहतील.

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तंबाखू, सुपारी, पान पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थांच्या सेवनास, ई-सिगारेटसह, थुंकण्यास व धुम्रपानास सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच चेहऱ्यावर मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे इत्यादी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर खालीलप्रमाणे दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन, धुम्रपान करतांना व थुकतांना आढळल्यास रुपये १००० रुपये दंड व १ दिवस सार्वजनिक सेवा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये ३००० दंड व ३ दिवसाची सार्वजनिक सेवा, तिसऱ्यांदा व त्यानंतर आढळल्यास रुपये ५००० दंड व ५ दिवस सार्वजनिक सेवा द्यावी लागेल. त्याचप्रमाणे सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे यासाठी रुपये २०० दंड व तद्नंतर पुन्हा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल.

दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तु विक्रेते आणि ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे तसेच विक्रेत्यांनी मार्कींग न करणे यासाठी ग्राहकांना रुपये २०० दंड तर विक्रेत्यांना रुपये २००० दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल. किराणा जिवनावश्यक वस्तू विक्रेत्याने वस्तूंचे दरपत्रक न लावणे यासाठी रुपये २००० दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल.

 सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात, व्यापार व पुरवठा आणि वितरण कायदा-२००३ मधील कलम ४ नुसार रुपये २०० दंड, कलम ५ नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी १००० दंड किंवा २ वर्षे शिक्षा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये ५००० दंड  किंवा ५ वर्षे शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येईल. उत्पादनाकरिता  कलम ७ नुसार पहिला गुन्हा रुपये ५००० दंड किंवा  २ वर्ष शिक्षा, दुसरा गुन्हा रुपये १०००० दंड किंवा पाच वर्षाची शिक्षा, तसेच विक्रेत्यांकरिता पहिला गुन्हा १००० दंड किंवा १ वर्ष शिक्षा, दुसऱ्यांदा आढळल्यास रुपये ३००० दंड किंवा २ वर्ष शिक्षा देण्यात येईल.

टु व्हीलर १+१ व्यक्ती अत्यावश्यक कामाकरिताच, थ्री व्हीलर १+२ व्यक्ती, फोर व्हीलर १+२ व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करीत असल्यास नियमानुसार दंडनिय कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचेवर साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणी भारतीय दंड संहिता १८६० तसेच इतर संबंधीत कायदे व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad