आरोग्य आढावा बैठकीत सुचना देताना जिल्हाधिकारी |
Post Top Ad
बुधवार, २२ जुलै, २०२०
आरोग्य सेवेबाबत येणाऱ्या तक्रारींचा लवकर निपटारा करा; जिल्हाधिकारी
यवतमाळ: आरोग्य विभागामार्फत बहुतेक योजना दीर्घ कालावधीसाठी राबविल्या जातात. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी करतांना नेहमी येणाऱ्या अडचणींची तपासणीसूची ठेवावी व त्यानुसार तक्रारींचा जलद निपटारा करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ त्वरीत देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा व प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांचा त्रैमासिक आढावा घेण्यात आला.यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधीकारी सुनिल बल्लाळ, जिल्हा परिषदेचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नगर प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी आपल्या कार्यालयाच्या ठेवणीनुसार आपली प्रतिमा ठरते असे सांगून कार्यालयाच्या आवारात तंबाखुजन्य पदार्थ खाउुन थुकण्यांवर प्रतिबंध ठेवण्यासाठी कार्यालयाने कर्मचाऱ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांवर वचक बसावा म्हणून कार्यालयाने यासाठी दर महिन्यात वसुली केलेल्या दंडाची व नोंदविलेल्या गुन्ह्याची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती सादर केली. तर प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती दिली. तसेच मातृवंदना योजनेत लाभार्थ्यांची खाते पोस्ट ऑफीस बँकेत सुरू केल्याने इतर बँकांत जीरो बॅलेंन्समुळे येणारी अडचण निकालात निघाल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ‘गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या केंद्राची माहिती देणाऱ्यास बक्षीस’ या योजनेच्या स्टीकरचे अनावरण जिल्हाधिकारी सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला तंबाखू नियंत्रण पथकाच्या डॉ. मनाली बोराडे, एड्स नियंत्रणच्या पर्यवेक्षक प्रीती दास, गर्भलिंग निदान दक्षता पथकाच्या विधी सल्लागार पूनम महात्मे, किशोर स्वास्थ कार्यक्रमाच्या समन्वयक किरण ठाकरे, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या समन्वयक पुर्णीमा गजभीये व सबंधीत अधिकारी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response