या वृत्तपत्राची होतेय चर्चा

या वृत्तपत्रांची होतेय चर्चा
महाराष्ट्र24राज्यात अनेक मोठे आणि लोकप्रिय मुख्यपत्र आहेत. मात्र कोरोना च्या संकटात कोणीही फारसे आक्रमक होऊन आणि वास्तव प्रस्थितीवर लिहितांना दिसून येत नाही.

राज्यात सध्या लाखांच्या वर कोरोना रूग्णांची संख्या गेली आहेत. अशा प्रस्थितीत माध्यमांची भूमिका महत्त्वाची मानली जात असताना औरंगाबाद मध्ये एका वृत्तपत्राने कोरोना संदर्भात बातमी प्रकाशित केल्याने प्रशासनाने गुन्हा दाखल केल्याने याबाबत सरकारी यंत्रणेला हायकोर्टाकडून खरडपट्टी केल्याची माहिती पुढे आली आहे.
दैनिक दिव्य मराठी ची वाटचाल
औरगांबाद येथून २०११ पासून दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रांची सुरूवात झाली. तद्नंतर काही वर्षात मराठवाडा, विदर्भ सह नासिक, सोलापूर आदी ठिकाणी आवृत्ती सुरू झाली. कमी काळात वाचकांची संख्या सुध्दा लाखोच्या वर गेली. विशेष म्हणजे दिव्य मराठीने सुरू केलेल्या सुखद सोमवार मधिल सकारात्मक बातम्याची दखल खुद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती.
कोरोनामुळे नागरिकांचा जीव जात असताना प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी यांना धारेवर धरत दैनिक दिव्य मराठीने दि.२४ जून च्या अंकात २०६ नागरिकांचे मारेकरी कोण? अशा प्रकारची बातमी प्रकाशित केली होती. तद्नंतर सरकारी यंत्रेणी या वर आक्षेप घेत 'दिव्य मराठी' विरोधात गुन्हा दाखल केलं.

त्या नंतर 'दिव्य मराठी' ने प्रसिद्ध केलेल्या बातम्यांचा संदर्भ देत हायकोर्टाने सरकारी यंत्रेणीला खडसावले, त्यामुळे राज्यात दिव्य मराठी च्या बातम्यांची नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू असून वास्तव आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या प्रकाशित करित असल्याने दिव्य मराठीचे कौतुक होत आहे. तर दुसरी कडे प्रशासनातील निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दिव्य मराठीची धडकी भरल्याचे समजते.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने