महाराष्ट्र24। सध्या कोरोना या महामारी आजाराने सगळेच संकटात आहेत. त्यातच स्वतःची पत्नी गेल्या दीड महिन्यापासून माहेरी गेली. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात आलेल्या लसूण विक्रेत्याने स्वतःच्या तीन चिमुकल्या मुलीचे चाकूने गळा कापून हत्या करून नंतर स्वतःच आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नालासोपारा मध्ये घडली आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास परमार वय ३५ वर्ष असे आपल्या मुलांची हत्या करुन आत्महत्या करणाऱ्या लसूण विक्रेत्याचे नाव आहे. तो नालासोपाऱ्यातील पुर्वेच्या डॉन लेन परिसरातील बाबूल पाडा येथे राहत होता. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांची मुलगी नंदीनी वय ८ वर्षे, नयना वय ३ वर्षे आणि नयन वय १२ वर्षे या तीन मुलांची चाकूने गळा चिरून हत्या केली आणि नंतर स्वत:वर देखील चाकूने वार करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहेत.
कैलास हा लसूण विक्रीचा व्यवसाय करीत होता. पण टाळेबंदीत व्यवसाय बुडल्याने तो घरीच होता. कैलासचे वडील विजू परमार यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कैलासची पत्नी दीड महिन्यापासून माहेरी गेली आहे. यामुळे कैलासच आपल्या तीनही मुलांचे पालनपोषण करीत होता. आज सकाळी त्याने फेसबुकवर आपल्या पत्नीचा फोटो दुसऱ्या व्यक्तीबरोबर पहिला होता.
नालासोपारा पूर्वेच्या डॉन लेन परिसरात शनिवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या तीन लहान मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या व्यक्तीने हे कृत्य का केलं याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.पत्नी दिड महिन्या पासून माहेरी गेल्याने कैलासने तीन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी. फेसबूक वर स्वतःच्या पत्नीचे फोटो दुसऱ्या व्यक्ती सोबत पाहून बहुतेक हे पाऊल टाकलं असावं अशी चर्चा आहेत.
कैलास जेवणासाठी मुलांसह वडिलांकडे जात होता. यामुळे शनिवारी दुपारी त्याने ही बाब वडिलांना सांगितली.
शनिवारी संध्याकाळी ४ वाजता चहापाण्यासाठी वडील त्याला बोलवायला गेले असल्याने त्याने मुले झोपली आहेत. रात्रीच जेवायला येतो असं सांगितलं. पण आठ वाजले तरी कैलास आला नसल्याने त्याचे वडील पुन्हा त्याला बोलवायला गेले. यावेळी कैलासने दरवाजा उघडला नाही. म्हणून त्यांनी शेजारच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर कैलास आणि त्याची तीनही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना घरात एक साडी छताला टांगलेली आढळून आली. यामुळे कैलासने मुलांची हत्त्या करुन स्वतःचा गळा चिरण्याअगोदर गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पाठविले आहेत. सध्या पत्नी सोडून गेल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे पालघर पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी सांगितले.