महाराष्ट्र24 । गेल्या आठ दिवसा पासून काॅग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिकेची झोड उठवली आहे.त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहूल गांधींचे कान टोचत राष्ट्रहिताच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र आले पाहीजे अस मत पवार यांनी व्यक्त केलं.
सध्या देशात भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्ष वरून केंद्र सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी टीकेची झोड उठवत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे कान टोचलेले आहे. देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावरून आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे.
१६६२ च्या युद्धानंतर चीनने भारताचा पंचेचाळीस हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो आजही परत मिळालेला नाही, अशी आठवण करून देत राष्ट्राच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करू नका अशा शब्दात शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते. पवार बोलताना पुढे म्हणाले की, भारत-चीन संघर्ष करून सत्ताधारी आणि काँग्रेस दरम्यान सुरू असलेल्या वाक्य युद्धावर त्यांनी भाष्य केले. राहुल गांधींचे कान उपटताना भूतकाळातील घटनांचे दाखलेही दिले. आठ दिवसापूर्वी झालेल्या भारत-चीन संघर्ष यावेळी चिन्हे भारताचा काही भाग बळकावला ही गोष्ट खरी आहे. किती भूभाग बळकावला ते माहीत नाही. पण १९६२ च्या युद्धानंतर चिन्हे आपला ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो अजूनही चीनने सोडलेला नाही. जेव्हा आपण आरोप करतो, तेव्हा पूर्वीच्या काळात मी असताना काय घडलं याचा मी विचार करतो.
शेवटी हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्या वर राजकारण करता कामा नाही, असा सल्ला पवारांनी राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता दिला. चीन भारत प्रश्न संवेदनशील आहे. चिन गलवान खोऱ्यात कुरापती काढली ही खरे आहे. मात्र, असे असले तरी चीन-भारत युद्ध होण्याची शक्यता नाही, असं पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. १९९३ मध्ये संरक्षणमंत्री असताना मी, चीनला गेलो होतो. त्यावेळी हिमालयन बॉर्डरवर सैन्य कमी करण्याबाबत सहा दिवस चर्चा झाली. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव चीनला गेले आणि त्यांनी दोन्ही बाजूचे सैन्य कमी करण्याचा करार केला.
९३ आणि आणि ९५ लाही हाच करार झाला. त्यामुळे जेव्हा कधी संघर्ष होतो, तेव्हा दोन्ही बाजूने फायरिंग केली जात नाही. पण गलवान खोऱ्यात फायरिंग झाली नाही झटापटी झाली कुणीही गोळीबार केला नाही तर त्याच्यात धक्काबुक्की झाल. करारा मुळेच या भागात गोळीबार झाला नाही, रस्त्यावर अतिक्रमण करताना चिनी सैन्याला रोखलं, म्हणून झटापटी झाली. गस्त घालताना कोणी आडवं आला आणि असा काही संघर्ष झाला तर संरक्षण मंत्र्यांचे अपयश आहे, असं म्हणून चालणार नाही. ते योग्य नाही. झटापट होते, याचा अर्थ तुम्ही जागरुक होता असा होत नाही तर चिनी सैन्य कधी आले आणि कधी गेले हे कळलं असतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.