सुर्यग्रहन बाप-लेकाच्या जीव घेईल असं वाटलं नव्हतं, पुजापाठ करून अंघोळी साठी वाघाडी नदीपात्रात उतरलेल्या बाप-लेकांना पाण्याचा अंदाज न आल्याने सुर्यग्रहनांच्या दिवशी नदीच्या पात्रात बुडून वडील व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्हातील घाटंजी येथे घडली.
बाप-लेकांच्या मृत्यूने घर रस्त्यावर आले
सुर्यग्रहनांची पुजा पाठ करून अंघोळी नदीपात्रात करण्यासाठी नदीत उतरलेल्या बाप-लेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने मृतकांचे घर रस्त्यावर आले आहेत.
यवतमाळ जिल्हातील घाटंजी येथील बेलोरा रोडवरील वाघाडी नदीच्या काठावरील शनी मंदिरात पुजापाठ-विधी करण्यासाठी गेले असता. अग्रहारी कुटुंबातील दोन सदस्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली व मृतदेह शवविच्छेदना करीता घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले पुढील तपास सुरू आहे.
रविवारी  सुर्य ग्रहण असल्याने ग्रहनामधील पुजा अग्रहारी कुटुंबांनी आयोजित केली होती.
पुजा पाठ आटोपल्यावर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या अग्रहारी कुटुंबातील संजय शिवाप्रसाद अग्रहारी वय वर्षे ४३ व आदित्य संजय अग्रहारी वय वर्ष १२ मुलगा हे दोघे जण नदीच्या काठावरील आंघोळ करीत असताना खोल पाण्यात बुडून या बाप-लेकांचा मृत्यू झाला.

