भारत आणि चीन या मध्ये सीमा वादावरून झटापटीत झालेल्या वादात भारताचे २० जवान शहीद झाल्याची घटना घडल्या नंतर भारतातील तिन्ही सैन्य दल चीन वर नजर ठेवून आहेत. अशा रविवारी संरक्षण मंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यात तिन्ही सैन्यदल प्रमुख उपस्थिती होते.
दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले असले तरी ही चीनचे यात ४५ ते ५० सैनिक ठार केल्याची माहिती पुढे आली आहेत.लडाखा मध्ये चीन चा कर्नल भारताच्या ताब्यात असल्याचे समोर आले आहे.
भारतीय सैनिकांनी चीनच्या अनेक सैनिकांना घेरून ४५ ते ५० सैनिक ठार केल्याची माहिती आहे.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या पुर्वी देशाच्या तिन्ही सैन्यदल प्रमुखांशी चर्चा केली आहेत. लडाखा मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर देशाचे नौदल, हवाईदलही अलर्टर आहेत. तिन्ही सैन्यदलांनी अलर्ट राहण्याबाबतचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी दिला आहे.
भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांनी केलेल्या अतिक्रमण थांबवण्यात यश आल्याचे बोलल्या जात असून गलवान मध्ये भारतीय जवानांनी धाडसी कारवाई केल्याचे समजते. भारत-चीन सीमा वादा सुरू असल्याने वायुसेना च्या जवानांची सर्व सुट्टी रद्द केल्याची माहिती आहेत. चीनचा कर्नल भारतीय जवानांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत.
बिहार रेजिमेंटचे जवान चीनच्या काळ बनले, १८ जणांच्या माना पिरगळल्या
भारताने सुध्दा चिनी सैनिकांना पडकले होते, अशी माहिती व्ही. के. सिंह यांनी दिल्याचे समजते. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी म्हटले आहे की, आमच्या क्षेत्रात आमचे सशस्त्र अष्टौप्रहर तयार आणि सतर्क असते. कोणतेही परिस्थिती हाताळण्यासाठी तयार आहोत, असे भदौरिया यांनी म्हटले आहे.

