अन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी 



अन् तांड्यातला मुलगा बनला उप-जिल्हाधिकारी 
लाखो जण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नानाविध कौशल्य, ध्येयप्राप्ती कडे असताना रानावनात,तांड्यात राहणारा समाज म्हणजे बंजारा समाज. बंजारा समाजातील मुलगा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगची परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद संपूर्ण यवतमाळ जिल्हातील समाज बांधवांना झाला आहेत.

विरेंद्र कैलासचंद्र जाधव असे उपजिल्हाधिकारी झालेल्या युवकाचे नाव आहेत. विरेंद्र यांचे वडिल पोलीस खात्यात जमादार म्हणुन नोकरीला होते. मात्र एका आजाराने कैलासचंद्र जाधव यांचे २०१६ मध्ये निधन झाले. अन् विरेंद्र च्या डोक्यावरची सावली हरवली अशा ही कठीण प्रस्थितीत विरेंद्र यांनी न डगमगता जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग ची परिक्षा देण्याची तयारी सुरू ठेवली. घरात मोठ्या बहिणीचे लग्न झाल्या नंतर आई इंदूमती जाधव आणि विरेंद्र हे दोघेच राहत होते.विरेंद्र जाधव यांचे वडिल आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील असून ते ११ वर्षा पासून यवतमाळ येथील पृथ्वीराज नगर मध्ये राहत आहेत.
आई आणि मामा सोबत विरेंद्र

अगदी काल परवा पर्यंत आपल्या अंगाखांद्यावर खेळणारा छोरा(पोरगा) आभाळा एवढा झाला ही खबर आर्णी तालुक्यातील महाळुंगी गावात वाऱ्या सारखी येताच विरेंद्र च्या नातेवाईक व गावकरी जणु दिवाळी साजरी केली असे चित्र होते.
विरेंद्र याने २०१५ पासून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगची परिक्षेची तयारी सुरू केली असताना नागपुर येथे इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेतलं. बी.टेक. केमिकल मध्ये पदवी प्राप्त केल्या नंतर एल.अॅड. टी. कंपणीत एक वर्ष नोकरी सुध्दा केली. संघर्षातून जात असताना उपजिल्हाधिकारी झाल्याची माहिती विरेंद्र जाधव ला सोशल मिडीयाच्या माध्यमातून मिळाली. तद्नंतर हि माहिती त्याने सर्वात आधी तिच्या आईला दिली आणि शुभेच्छा पाऊस विरेंद्र वर सुरू झाला.

नवनिर्वाचित उपजिल्हाधिकारी विरेंद्र यांची प्रतिक्रिया


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने