गेल्या काही दिवसा पासून काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील या दोघांत टीकास्त्र युद्ध सुरू आहेत. अशात आज दैनिक "सामना"च्या अग्रलेखातून राधाकृष्ण विखे पाटील यांना चांगलेच सुनावले आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील हे अधूनमधून विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहेत याचे प्रयोग ते स्वतः करित असतात. विखे महाशयांनी दोन दिवसापूर्वी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या बाबत असे महान भाष्य केले की, "एवढी वर्षे काॅग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापुर्वी कधीच पाहिले नाहीत". यावर शांत बसतील ते थोरात कसले! थोरातांनीही सांगितले की, "मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे!"
सामना अग्रलेखातील ठळक मुद्दे
महाराष्ट्राचे 'ठाकरे सरकार' स्थिर आहे. एकमेकांच्या मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी 'थोरातांची कमळ' हा चित्रपट गाजला होता. आता 'विखे-पाटीलांची कमळ' असा एक चित्रपट आला व पडला. काॅग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची 'टुर अॅण्ड' कंपणी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे.वैफल्य,दुसरे काय!
त्या नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून विखे पाटील यांना देण्यात आला आहेत. एकवेळ कोरोना वर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकार वर टिका करणाऱ्या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्हात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. एकंदरीत "सामना"च्या अग्रलेखातून फडणवीस,विखे आणि राणे यांचा समाचार घेण्यात आला आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response