महाविकास आघाडी सरकार मधील अनेक मंत्र्यांचे काम चांगले
सध्या कोरोना संकटाला पुढे जात असताना देखील महाविकास आघाडी सरकार मधील अनेक मंत्र्यांचे काम समाधानकारक असून जीवाची परवा न करता मंत्री घरा बाहेर पडून लोकांची अडचण समजून घेत आहेत. त्यामुळे अनेक मंत्र्यांना कोरोना सुध्दा झाला आहेत.
राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी रविवारी औरंगाबाद येथील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्राहक म्हणुन गेले आणि मनमानी करणाऱ्या कृषी केंद्र चालकाचा स्टिंग ऑपरेशन करून भांडाफोड केल्याने राज्यातील कृषी चालकांनी कृषीमंत्र्यांची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र दिसून येत आहेत.
सध्या संपुर्ण देशासह राज्यात कोरोना मुळे नागरिक संकटाचा सामना करित असताना दुसरी कडे जगाचा पोशिंदा ला कृषी केंद्र चालक युरिया, खते आदी शेती आवश्यक साहित्य असताना त्यांची जाणिवपूर्वक टंचाई निर्माण करून नंतर त्याच शेतीला आवश्यक शेत मालाची चडत्या किंमतीने विक्री करित असल्याचे कृषी मंत्र्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन वरून समोर आले आहेत.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला धडा शिकवणार; मंत्री भुसे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी आणि कृषी केंद्र चालक यांची कदापिही गय करणार नसल्याचा इशारा कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिल्याने अधिकारी व कृषी चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
थेट कृषीमंत्री शेतकरी ग्राहक म्हणुन कृषी केंद्रात गेले आणि त्या दरम्यान कृषी चालकाला युरियाची मागणी केली. मात्र दुकानदारांनी आपल्या कडे युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले तरीही कृषी मंत्री दादासाहेब भुसे तब्बल त्या कृषी केंद्रात दिड तास बसून राहिले. त्यानंतर कृषीमंत्र्यांने त्यांचे खरे रूप धारण करित घटनास्थळी कृषी अधिकाऱ्याला बोलवून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. गुणनियंत्रण अधिकाऱ्याला सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

