जम्मू काश्मीर मधील तीन जिल्हांत पाकिस्तानकडून पुन्हा एकवेळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याने सीमेपलिकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याची घटना घडली आहे.
जम्मू काश्मीरच्या कठुआ, राजौरी आणि पुॅछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांडून भारतीय जवानांवर गोळीबार करण्यात आल्याने एक जवान जखमी झाला होता. मात्र जखमी जवानांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या आधी दि. १४ जून रोजी पुॅछ जिल्ह्यातील सीमेवर गोळीबारातही एक जवान शहीद झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुॅछ जिल्ह्यातील कृष्णा खोरे सेक्टरमध्ये आणि राजौरीच्या नौशेरा सेक्टरच्या नियंत्रण रेषेजवळ आणि कुठआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमा परिसरात पाकिस्तान कडून अद्यापही मोर्टार डागले जात आहेत. गोळीबारही सुरूच आहे. याच दरम्यान गोळीबारात सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवान शहीद झाला.