मुंबई मधिल धारावी मध्ये कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने केलेल्या कामाची मोदी सरकारने दखल घेत महाविकास आघाडी सरकारचे कौतुक केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धारावी झोपडपट्टी मधिल कोरोना नियंत्रणात ठेवल्याने ठाकरे सरकारच्या कामाची दखल घेवून धारावी माॅडेलचं कौतुक केले आहेत.
कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेल्या धारावीत परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकार आणि महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबविल्याने कोरोना वर यश मिळवता आला. त्यामुळे केंद्र सरकारने ठाकरे सरकारचे दखल घेवून कौतुक केले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणुन धारावी कडे पाहिल्या जाते. धारावीत घनदाट वस्ती असल्याने त्या ठिकाणी कोरोना चा फैलाव होण सहाजिकच आहेत. मात्र ठाकरे सरकार आणि महापालिकेने योग्य खबरदारी घेत विशेष मोहीम राबवून कोरोना नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं आहेत.