Breaking

Post Top Ad

सोमवार, २२ जून, २०२०

अखेर धनंजय मुंडे कोरोनामुक्त


अखेर धनंजय मुंडे कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटीव्ह असल्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तब्बल ११ दिवसा पासून उपचार घेत असताना सोमवारी सायंकाळी मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. ते ब्रीचकॅडी रूग्णालयात कोरोनाच्या आजारामुळे भर्ती होते. दरम्यान याची माहिती भाजप नेत्या तथा बहिण पंकजा मुंडे यांना मिळताच त्यांनी धनंजय मुंडे सोबत भ्रमणध्वनी वरून संपर्क करून धीर दिला होता.

गेल्या ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू होते. धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केली असून आज सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना सुध्दा  कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहेत.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसा आधी श्वास घेताना त्रास जाणवत होता. दि. १२ जून रोजी धनंजय मुंडे व त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेच त्याच दिवशी मुंडे यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे खासगी सचिव प्रशांत भामरे व जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अन्य चार कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले. भामरे, जोशी व दोन चालक यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad