मुंबई:- 'संकटाचे रूपांतर संधीत करण्याची हिच 'योग्य'वेळ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.त्यावर शिवसेनेनी बाण सोडत मोदी वर टीकास्त्र सोडले आहे.पंतप्रधानांच्या सांगण्याचा खरा अर्थ भाजापातील नेत्यांनी समजून घेतला आहे व संकट हीच संधी मानुन राजस्थानमधील सरकारचे पाय ओढायला सुरूवात केल्याचा आरोप शिवसेनेनी केला आहे.
'देशात सध्या कोरोनाचे संकट भयंकर असताना भाजप मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावून मध्य प्रदेशातील सरकार पाडल्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा राजस्थानकडं वळवला आहे.राजस्थानात भाजपचं सरकार आणण्यासाठी 'ऑपरेशन लोटस' सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काॅग्रेस व सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना विकत घेण्यासाठी कोट्यावधी रूपयांची लालूच दाखविण्यात आल्याचा आरोप स्वतः मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.याबाबत तशी तक्रार काॅग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर बाण सोडत घणाघाती टीका केली आहे.