शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातु आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी सहा दिवसाचा बाळ मृत्युशी झुंज देत असल्याची माहिती कानावर पडताच थेट मुस्लिम समाजाच्या सहा दिवसाच्या बाळा मदत करून त्यांच्या वडिलांची विचार पुस केली.
सहा दिवसा पासून बाळाला मुलुंड मधील फोर्टिस हॉस्पिटल मध्ये मृत्युशी झुंज देत असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांना समजली.तद्नंतर लगेच आदित्य ठाकरे यांनी मदतीचा हात देत बाळाच्या वडिलांना धीर देत एक लाख रुपयांची मदत केली.आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले होते.
जन्मतःच ह्रदयात तीन ब्लाॅक असलेल्या सहा दिवसाच्या अर्भकाला आदित्य ठाकरे यांनी मदतीचा हात दिला आहे.युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा दि.१३ जुन रोजी वाढदिवस असतो.मात्र मुंबईतील घणसोली मध्ये राहणारे अब्दुल अन्सारी यांच्या नवजात बाळाच्या ह्रदयात तीन ब्लाॅक आणि एक छिद्र आहे.
