चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना झाला 'कोरोना'

चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना झाला 'कोरोना'

नवी मुंबई:- कोरोनाच्या संकटात अहोरात्र गस्तीवर असणार्‍या पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे आव्हान आहे.चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच कोरोनाची बाधा झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. मुंबईत चोरांची टोळी पकडण्यासाठी गेलेल्या दहा पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.नवी मुंबईतही एका कोरोनाग्रस्त चोरामुळे १५ पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.तर आरोपीचा वकीलही  क्वारंटाइन झाला आहे. नेहरू नगर पोलीस ठाण्यातील हे दहा पोलीस कर्मचारी असून त्यात दोन अधिकारी देखील आहेत.

जामीनावर रुग्णालयात दाखल केले
अटक केलेल्या आरोपी कोरोनाची लक्षण आढळली होती.त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली.त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.आरोपीला पोलिस ठाण्यातून जमिनीवर सोडण्यात आले असून रुग्णालयात दाखल केले आहे.अशी माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी काशिनाथ चव्हाण यांनी दिली आहे.
चोरांच्या टोळीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येते.तसेच, या आरोपींना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसही क्वारंटाइन आहेत. इलेक्ट्रॉनिक स्टोअरवर दरोडा टाकून साडेपाच लाखांचा माल लंपास केल्याचा आरोप या चोरांवर होता. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. मात्र चाचणीचा अहवाल येईपर्यंत पोलिसांना संसर्ग झाला होता. दरम्यान तीस वर्षाच्या एका व्यक्तीने तळोजात घरफोडी केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आले होते. आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पोलिस ठाण्यातील पंधरा पोलिसांना आणि एका वकीलाला होम क्वारंटाइम करण्यात आलं. हे सर्व चोरांच्या संपर्कात आले होते.


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने