नागपूर:- राज्य शासनाच्या दिशानिर्देशा प्रमाणे 'मिशन बिगिन अगेन' मध्ये नागपूर शहरात लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले आहे.त्याचा परिनाम गर्दी वाढण्यावर झाला आहे.त्यामुळे आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लाॅकडाऊन नियम पाळा,अन्यथा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली आहे.
नागपूर शहरात ३,५,व ८ जून पासून लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले आहे.त्यामुळे दुकाने काही अटींवर सुरू करण्यात आली आहेत.परंतू प्रतिबाधित क्षेत्रात शासनाच्या दिशानिर्देश पाळले जात नाहीत.त्याची कडक अंमलबजावणी नागरिकांनी करणे आवश्यक आहे.नाईक तलाव या प्रतिबाधित क्षेत्रात ८६ रूग्णांची भर पडली आहे.त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांतर्फे कोविड-१९ च्या गाईडलाईनचे पालन न करणे,खबरदारी न घेणे,बेजबाबदार पणाचे वर्तन करणे,यामुळे कोविड-१९ च्या रूग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.लाॅकडाऊन शिथिलता दिली याचा अर्थ स्वतःच्या आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे नव्हे.चार चाकी वाहनात वन प्लस टू आणि दुचाकीवर केवळ एक व्यक्ती अनुक्षेय असताना नियमांचे सर्रास उलंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे,सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे,आवश्यकता नसतानाही घराबाहेर पडणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा वागण्यामुळे नागपुरात कोरोना संसर्गचा गुणाकार होण्यास सुरूवात झाली.ही धोक्याची घंटा आहे.नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजेचे असल्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
