Breaking

Post Top Ad

शनिवार, १३ जून, २०२०

ये सायकल का चक्कर.......

ये सायकल का चक्कर.......

अकेली मत जिओ या चित्रपटात आगा आणि मिनू मुमताज यांचे ये सायकल का चक्कर कभी आगे कभी पीछे असे एक गाणे फार गाजले होते.खामगावच्या जी एस कॉलेजमध्ये शिकत असताना माझा वर्गमित्र डीएम गवई याला अनुसूचित जाती विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्याने ॲटलास कंपनीची सायकल विकत घेतली होती.सायकल असणे त्याकाळी एखादी कार असण्या सारखे होते . महिन्यातून एकदा तो आणि मी आमचे जन्मगाव असलेल्या पिंपळगाव काळेला 70 किलोमीटर या ॲटलस सायकलने डबल सीट जात होतो.कधी तो चालवायचा तर कधी मी चालवायचं. रस्त्यामध्ये मानेगावला एका व्यक्तीकडे थांबून गुळाचा चहा घेत होतो. एसटीचे भाडे एक रुपया 24 पैसे वाचवण्याचा दोघांना खूप आनंद व्हायचा. जाणे-येणे असा एसटीच्या भाड्याचा  तिकिटाचा खर्च प्रत्येकी दोन रुपये 48 पैसे वाचवल्याचा अपार आनंद व्हायचा कारण परिस्थितीच तशी बिकट होती.आज ती ॲटलास सायकल डोळ्यासमोर आहे आणि तिची आठवण होण्याचे कारण म्हणजे जगात ३ जून ला सायकल दिवस साजरा होत,असतानाच भारतातील ॲटलस कंपनीने आपल्या कारखान्यांना आर्थिक कारण सांगत टाळे लावून टाकले.ऑटोमोबाईल आणि टू व्हीलर नंतर सायकल सुद्धा लोक डाऊन ची बळी पडली आहे.

 भारतातील सर्वात मोठी 69 वर्ष जुनी ॲटलास कंपनी बंद झाली . देश-विदेशात या कंपनीचा ब्रांड होता. अमेरिकेतील मोठमोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्स मध्ये ॲटलास सायकल ची विक्री होत होती. त्याकाळात इंग्लंड मधील रेले , फिलिप्स,ही सायकल प्रसिद्ध होती.माझ्या आजोबांनी दत्तक घेतेलेले माझे वडील बंधू आर.एम.जोशी यांना त्याकाळी हर्क्युलस सायकल घेऊन दिली होती.त्या सायकलला डायनामा होता. सायकलच्या मागच्या चाकाला लावलेला डायनामा  चाका बरोबर फिरून पुढचा बल्बचा दिवा लागत असे. त्याचा प्रकाश बॅटरी  सारखा लांब जात असे. रात्री सायकलला दिवा असणे सक्तीचे होते. 50 पैसे  भरून मिळणारा नगरपालिकेचा बिल्ला सुद्धा सायकलला आवश्यक होते. तो बिल्ला म्हणजे जणू सायकल चालवण्याचे लायसन होते. हर्क्युलस सायकल, इस्टर्न स्टार सायकल, हिरो सायकल,फिलिप्स सायकल,रॉयल स्टार,आरएमआय अशा कंपन्यांच्या या सायकली होत्या पण लोकप्रिय सायकल होती अँटलस.पाठीवर पृथ्वी घेतलेला शक्तिशाली माणूस या सायकलचे प्रतीकचिन्ह होते.त्या जमान्यात वेळ पाहण्यासाठी एचएमटी मनगटी घड्याळ आणि चालवण्या साठी सायकल असणे म्हणजे फार प्रतिष्ठेची बाब समजल्या जात होती.
Journalist N M Joshi Yavatmal
प्रा.न.मा.जोशी
बळवंतराव बापट दिवंगत झाले आहेत पण त्यांचे दहा रुपये अजून द्यायचे बाकी आहेत.आयुष्यात पहिल्यांदा 1979 मध्ये स्कूटर शिकलो आणि अल्विन पुष्पक ही स्कूटर घेतली. नंतर मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या शिफारसपत्रावरून शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री कोट्यातून वेस्पा स्कूटर यवतमाळ अर्बन बँकेचे कर्ज काढून घेतली होती.तेव्हा वेस्पा स्कूटरची फार क्रेझ होती. तर अशा या सायकलला एचएमटी घड्याळ कंपनी देखील बंद झाली आहे.सायकल वापरणार्‍यांची सर्वाधिक संख्या देशात पुणे शहरात होती.विद्येचे माहेर घर अशी ख्याती असलेले पुणे म्हणजे सायकलीचे शहर अशी ओळख होती.आज जपानमध्ये सायकलचा वापर सर्वाधिक होतो.नेदरलॅंडची राजधानी ॲम्स्टरडॅम मध्ये तर केवळ सायकल चालवण्याची परवानगी आहे. सायकल पंक्चर झाल्यावर घरीच पंक्चर काढावे लागत होते.अर्धा दिवस त्यातच जात होता. त्यासाठी साहित्यही लागायचे. मी तर दहावीत असताना चोरून  सायकल शिकलो.सायकल शिकताना पडलो तेव्हा माझा हात फ्रॅक्चर झाला होता. तो गावातील एका दादजीू खोडके नावाच्या वृद्ध गृहस्थाने बांबूच्या पट्ट्या बांधून एक महिना गळ्यात हात अडकवून ते फ्रॅक्चर  जोडून दिले होते.सायकल चालवल्याने पायांचा आणि फुफ्फुसांचा व्यायाम होतो आणि  उंची वाढते असे आम्हाला शाळेत असताना गुरुजी सांगायचे.  शाळा कॉलेज ऑफिस सर्व ठिकाणी सायकलीच दिसत होत्या.जुलै 1974 मध्ये यवतमाळला बाबाजी दाते कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी श्याम मानव,एकनाथ डगवार,देवराव जीभकाटे अशा मित्रमंडळींनी वर्गणी गोळा करून मुकुंदराव बापट सायकल स्टोअर मधून हिरो सायकल घेऊन भेट दिली होती.


दुरुस्त करणारे काही कारागीर असे होते की, ते सायकलचे सर्व स्पेअर पार्टस् पूर्णतः वेगळे करून सायकल बनवायचे.सायकल घेतल्यावर अनेक इंग्रजी शब्दांचा परिचय झाला मात्र त्यांना मराठीत कोणता शब्द आहे,हे अजूनही समजले नाही.उदाहरणार्थ हँडल,ब्रेक,सीट,सीट कव्हर, कॅरियर, फ्रीव्हील, स्पोक, ऑइल, फ्रीव्हील, पायडल, ट्यूब, टायर, चेन, पंक्चर, ग्रीस, सोलूशन, ओहरायलिंग, स्न्ड, बफर, नट बोल्ट, वॉल ट्यूब,वॉल पिन, कॉर्टर पिन असे अनेक शब्द सायकल मुळे समजले.आता सायकल मध्ये अनेक नवीन फीचर्स जुळले आहेत. हँडल मध्ये बदल झाला, रेस च्या सायकली आल्या,वायर ब्रेक आले,स्पोर्ट च्या सायकली आल्या. मात्र जुन्या सायकलची मजा काही औरच होती.
 तर अशीही एटलस सायकल,सत्तर वर्षापूर्वी राजधानी दिल्ली पासून 40 कीलो मीटर अंतरावर हरियाणातील सोनीपत येथे ॲटलास कंपनी ने सायकलचा कारखाना काढला होता,देशाच्या विभाजनानंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या जानकीदास कपूर यांनी हा कारखाना सुरू केला होता.स्वीडनच्या नोबेल म्युझियमच्या भिंतींवरही सायकल चमकली होती,ही बाब आता इतिहास जमा झाली आहे.त्याकाळात सायकलींचा रंग काळा. होता नंतर मात्र तो हिरवा आणि बहुरंगी व्हायला लागला.सायकल कारखाना बंद झाल्यामुळे लाखो कर्मचार्‍यांवर उपासमारीची पाळी आली आहे.काही कामगार तर वीस ते पंचवीस वर्षापासून या कारखान्यात काम करीत होते.कारखान्याचे बंद होणे ही घटना साठी अतिशय दुःखद आहे.1978 मध्ये कंपनीने  भारताची पहिली रेसिंग सायकल लाँच केली होती.1982 मध्ये दिल्ली एशियन गेम्स मध्ये याच कंपनीने सायकली सप्लाय केल्या होत्या. कंपनीने सुनील शेट्टी आणि सानिया मिर्झा ॲम्बेसिडर बनवले होते.

गोल्ड मेडलिस्ट विनोद बिंद्रा यांनीसुद्धा लॉन्च केले होते,कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे की, कारखाना तात्पुरता बंद केला आह .कामगारांना 50 टक्के वेतन दिल्या जाईल. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली झाली तर सुरू करण्याचा विचार केल्या जाईल.असे असले तरी सुरू होण्याची आशा नसल्याचे चित्र आहे. बाय द वे,सायकल इतकी लोकप्रिय होती की, 1978 मध्ये जनता पार्टी समर्थक उमेदवार जांबुवंतराव धोटे यांच तत्कालीन  शिष्योत्तम नानाभाऊ एंबडवार लोकसभेला उभे होते तेव्हा त्यांनी सायकल हे निवडणूक चिन्ह घेतले होते.मूळ अमरावतीचे असलेले श्रीधर जवादे यवतमाळ मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते.जवादे यांनी एंबडवार यांचा केवळ दहा हजार मतांनी पराभव केला होता.गंमत अशी की, श्रीधर जवादे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडून आल्यावर प्रमाणपत्र घ्यायला यवतमाळात आले होते.त्यानंतर त्यांनी क्वचितच जनतेला दर्शन दिले हा इतिहास लोकांच्या स्मरणातून जात नाही.

लेखक हे जेष्ठ पत्रकार आहेत.मो.न.8805948951



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad