Breaking

Post Top Ad

गुरुवार, १८ जून, २०२०

मोदींनी "चीनी लाल माकडांवर विश्वास ठेवू नये"-सामना

मोदींनी "चीनी लाल माकडांवर विश्वास ठेवू नये
भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले त्यावरून सामनाच्या आजच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सह चीनला चांगलेच फटकारलं आहेत.
चीनने केलेला हल्ला म्हणजे एक प्रकारचा इशारा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "चीन लाल माकडांवर विश्वास ठेवू नये! पंडीत नेहरूंचा जशा विश्वासघात झाला तसा तुमचा होईल." अशा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहेत. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी युद्ध झाले. हे युद्ध रक्तरंजित आहे. त्यात भारत मातेचे २० जवान शहीद झाल्याचे वृत्त संतापजनक आहे, पण युद्ध नसून दोन देशांच्या सैन्यांत हाणामारी झाली असे सांगण्यात येत आहे. पण हाणामारीत आमचे वीस जवान मारले जातात. चीनच्या बाजुचे चाळीसेक जवान मारले गेले असल्याचे वृत्त येते म्हणजे दोन देश सीमेवर मिळेल त्या हत्याराने लढत आहेत. 
डोकी फोडत आहेत. कोथळे काढत आहेत. सीमेवर रक्ताचे सडे भारत-चीन सीमेवर हा संघर्ष व चढाया पन्नास वर्षानंतर सुरू झाल्या व २० जवानांचा हौतात्म्या नंतरही देशाचे पंतप्रधान काय झाले ते सांगण्यासाठी जनतेसमोर येऊ नयेत हे धक्कादायक आहे.लडाखा गलवान व्हॅली सीमेवर सोमवारी रात्री चीन आणि भारत सीमेवर ही दंगल झाली आणि त्यात आपले २० जवान शहीद झाल्याचे अधिकृतपणे सांगायला बुधवार उजाडावा लागला असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
अग्रलेख मधील ठळक मुद्दे 
अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणाऱ्या चीनची स्वतःची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे. त्याने भारतावर आधीच अतिक्रमण केले आहे. लडाखाच्या भारत हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे. दिल्लीत बैठका आणि चर्चा सुरू आहेत. तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो कोणालाच परवडणार नाही, पण २० जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय? प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतीमेस त्यामुळे धक्का बसेल
 पंडीत नेहरू, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी धगधगत्या सीमा शांत ठेवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे सीमेवरील संघर्षाची फार मोठी किंमत देशाला मोजावी लागते. चीनबरोबर जो संघर्ष आज सुरू आहे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेला परराष्ट्र धोरणात आहे असे जाहीर सभांतून सांगितल्याने टाळ्या मिळतात, पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे. ʼगडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकार नामर्द आहेत. म्हणुन सीमेवर शत्रू अरेरावी करतोʼ, असा ठणठणीत टिका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहेत.
भारत-चीन वादावरून सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकाला चांगलेच धारेवर धरले असून चीनचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादला येऊन पंतप्रधान मोदींच्या झोपाळ्यावर ढोकळे खात बसले तेव्हाही याच स्तंभातून आम्ही इशारा दिलाच होता अशी आठवण सुध्दा शिवसेनेनी अग्रलेखातून करून दिली आहे. "चीनी लाल माकडांवर विश्वास ठेवू नका! पंडीत नेहरूंचा जशा विश्वासघात झाला तसा तुमचाही होईल". असा सल्ला देखील 'सामना'च्या अग्रलेखातून मोदींना देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad