पणन महासंघाने यवतमाळ जिल्हातील आर्णी तालुक्यामधील शेतकऱ्याना वणी येथे कापूस विक्री साठी नेण्याचे आदेश काढल्याने शेतकरी राजा मोठा अडचणीत सापडला होता. या गंभीर बाबीची दखल आर्णी-केळापूराचे भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी घेत आर्णी तालुक्यात च कापूस खरेदी व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि प्रशासनाला कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास भाग पाडले.
दरम्यान तालुक्यातील बोरगांव येथे कापूस केंद्राचे उदघाटन करताना आमदार धुर्वे म्हणाले की,शेतकरी आधीच कठीण प्रस्थितीतून समोर जात आहे. अशा प्रस्थितीत अधिकारी वर्ग शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर अधिकाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल असा इशारा यावेळी आमदार डाॅ संदीप धुर्वे यांनी दिला.
आर्णी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याना कापूस विक्रीसाठी वणी येथे नेण्याचे आदेश दिल्यानंतर आमदार डाॅ. संदीप धुर्वे यांनी युद्ध पातळीवर पाठपुरावा करून आज दि.१८ जून रोजी तालुक्यातील बोरगांव येथील मानुदास महाराज जिनिंग अॅड प्रेसिंग मध्ये कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
