जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी..

जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी..

चीन बरोबर झालेल्या झटापटीत भारत मातेचे वीर जवानांनी जीवाची बाजी लावत वीर मरण आलं. त्यानंतर देशभरातून या वीरांना आदरांजली वाहण्यात येत असून चिनी मालावर बहिष्कार घालण्याची जोरदार मागणी देशातील नागरिकांकडून बोलून दाखवली जात आहे. त्यातच बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन, खिलाडी अक्षय कुमार आणि सोनू सुद यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहत भावनिक पोस्ट ट्विटर वर टाकली आहे.

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या भावनिक पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'जरा ऑख मे भरलो पानी', जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बानी. 'या जवानांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांनी देशातील १३३ करोड नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिलं. भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांना माझा सॅल्यूट, जय हिंद' अस ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं.

गलवाल मधील घटनेवर ट्विटर च्या माध्यमातून भारतीय सैनिकांचा कौतुक करत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी लिहिले आहे की, सीमेवर शहीद होणार्‍या प्रत्येक जवान माझ्या घरातलाच कुणीतरी आहे. त्याचबरोबर खिलाडी अक्षय कुमार यांनी म्हटले आहे की, आपण सगळे नेहमीच या सुर जवानांच्या ऋणात राहणार आहोत. अभिनेता सोनु सुद यांनी भावनिक होत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने