अखेर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर

अखेर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर

महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्यामुळे नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.
त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची कोणतीही नाराजी नव्हती. महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे आणि पाच वर्षात चांगलं काम करेल,'असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यादरम्यान म्हणाले.

आमची नाराजी नव्हतीच. काही विषयांची समोरासमोर चर्चा करावी लागते. मोठ्या बैठकांमध्ये ही चर्चा होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आमची सकारात्मक चर्चा झाली. चर्चेचे विषय प्रशासकीय होते. विविध विभागाच्या चर्चा होत्या. राज्यात कोरोना संकटात गरीब माणूस अडचणीत आला आहे, कोणताही वैयक्तिक मुद्दा नव्हता, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी दिली.

दरम्यान विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत सत्ता स्थापन करते वेळी चर्चा झाली. समान वाटप असावं हे ठरलेला आहे. त्यावर जास्त चर्चा करायची गरज नाही. कोणत्याही बैठकीत काँग्रेसला डावलं असं कुठेही दिसले नाही. विकास निधीच्या वाटपाचा विषय असतोच, या निधीचे समान वाटप व्हावे असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने