दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पाटील यांचा समाचार घेतांना म्हणाले की, मध्यावधी निवडणूक लागणार की, नाही या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी सांगतील.परंतू भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कधी झाले निवडणूक निर्णय अधिकारी असा सवाल करित जोरदार टोला लगावला. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पुर्ण करणार असल्याचा विश्वास यावेळी राऊत यांनी बोलून दाखवला.
फडणवीस यांना भेटी बाबत महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये कोणतीही नाराजी नाही,राजकीय पक्षा सोबत संवाद राहीला पाहीजे.दरम्यान यावेळी बिहार निवडणूक च्या तोंडावर पांडेनी राजकीय पक्षात प्रवेश केला.त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.महाराष्ट्राची बदनामी सहन केल्या जाणार नाही.मी,महाराष्ट्राची भूमिका मांडली असून बिहार निवडणूका संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वर भाजप कडून जोरदार टिका केल्या जात आहे.यावेळी संजय राऊत यांनी 'भाजप'ला इशारा देत म्हणाले की, 'दात उचकटले त्यांचे दात घशात जातील अशा इशारा दिला.फडणवीस नंतर शाहा आणि राहूल गांधी यांचीही मुलाखात घेणार असल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response