रत्नागिरी:- महाविकास आघाडी सरकार मध्ये गोंधळ माजला आहे.हा गोंधळ त्वरीत थांबवून राज्याला पुढे कस नेता येईल याचा विचार करण्याची गरज आहे.छोटा व्यवसायिक अडचणीत सापडला आहे.त्याला सावरण्याच्या दृष्टीने सरकराने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.ते कोकण दौरा दरम्यान बोलत होते.
नाभिक समाज यासाठी आक्रोश करत आहे.सलून व्यवसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी न दिल्यास कोरोना पेक्षा वेगळा तणाव वाढण्याची भीती नाकारता येत नाही.काही नियम व अटी घालून सलून व्यवसायाला परवानगी देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दापोली-रत्नागिरी येथे निसर्ग चक्रिवादळ ग्रस्तांना देण्यात आलेली तुटपंजी मदत,राज्यातील कोरोनाची विदारक स्थिती,लाॅकडाऊनचा गोंधळ आणि परिक्षांचा घोळ यावरून राज्य सरकार वर फडणवीस यांनी जोरदार टिका केली.दरम्यान दिशानिर्देशांनंतर अनेक राज्यांनी सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.राज्यातही ती परवानगी दिली गेली पाहीजे.