चीन विरोधात कोणी दंड थोपटले

तीन वर्षा नंतर पहिल्यांदाच अमेरिका या तिन्ही विमानवाहू युद्धनौका या भागात गस्त घालत आहे.विशेष म्हणजे चीनला अमेरिकेने संदेश दिला असून चीन करत असलेल्या दादागिरीला अमेरिकेने विरोध दर्शविला आहे.

सध्या संपूर्ण जग कोरोना या महामारी संकटाला दोन करून समोर जात आहे.मात्र दुसरी कडे चीनकडून विस्तारवादी भूमिकेला बळ देण्याचे प्रकार सुरू आहे.चीन कडून दक्षिण चीन समुद्रात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तीन वर्षा नंतर पहिल्यांदाच अमेरिका या तिन्ही विमानवाहू युद्धनौका या भागात गस्त घालत आहे.विशेष म्हणजे चीनला अमेरिकेने संदेश दिला असून चीन करत असलेल्या दादागिरीला अमेरिकेने विरोध दर्शविला आहे.
चीन समुद्रात आपले वर्चस्व वाढविण्यासठी प्रयत्न करित आहे.चीनने शेजारी देशांमध्ये यावरून वाद सुध्दा सुरू केले आहे.त्यामुळे चीनची दादागिरी वाढत चालली असल्याने आता चीन उत्तर देण्यासाठी अमेरिकेनेही याविरोधात दंड थोपटले आहेत.तैवानचा मित्र देश असलेल्या अमेरिकेने आपल्या तीन मोठ्या विमानवाहू युद्धनौका पाठवल्या आहेत.या तिन्ही विमानवाहू युद्ध नौका हिंदू महासागर आणि पॅसिफिक महासागरात तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने