मुंबई:-  राजकारणात कायमाचा कोणी कोणाचा मित्र अथवा दुश्मन राहत नाही,असे आपण बऱ्याच वेळा ऐकले आहेत.मात्र हे सत्य आहे.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.त्या अनुषंगाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कॅडी रूग्णालयात त्यांच्या वर उपचार सुरू आहे.मुंडे यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे.
कोरोना ने दोन भावांमध्ये  आणला गोडवा 
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यात काही कारणावरून मतभेद आहे.मात्र भावाला कोरोना झाल्याची माहिती मिळताच भगिनी कुठल्याही विलंब न लावता भ्रमणध्वनी वरून संपर्क करून भावाला बोलून हिम्मत देते आणि म्हणते "दादा तू काळजी करू नकोस लवकर बरा होशील"
राज्यातील मंत्री मंडळातील या आधी सुध्दा अशोक चव्हाण,जिंतेद्र आव्हाड यांना कोरोना ला समोर जावावे लागले होते.तद्नंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा कोरोना चाचणी अवाहल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.यांची माहिती मिळतात माजी मंत्री तथा त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनी त्वरीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत फोन वरून संपर्क साधला.
