Breaking

Post Top Ad

मंगळवार, १६ जून, २०२०

भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा निधन

भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा निधन

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार तथा जळगाव जिल्हाचे अध्यक्ष हरिभाऊ माधव जावळे यांचा मुंबईत निधन झाला. जावळे मृत्युसमयी ६७ वर्षाचे होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे हरिभाऊ जावळे वर मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता. उपचारादरम्यान त्यांची मंगळवारी प्राणज्योत मलावली.
२०१४ मध्ये १५ व्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचे नाव जाहीर केले होते. मात्र ऐन वेळी त्यांच्या ऐवजी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना संधी देण्यात आल्याने जावळे यांचा पत्ता कट झाला होता. लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने आमदारकी ची संधी सुद्धा दिली होती. हरिभाऊ जावळे यांनी त्यावेळी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता.भाजप ने एक चांगला चेहरा गमावल्याने भाजप ला मोठा धक्का मानल्या जात आहे.
दि. ३ जून रोजी हरिभाऊ जावळे यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर प्रकृती बिघडत असल्याने त्यांना दि.५ जूनला मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र मंगळवारी दुपारी दरम्यान जावळे यांनी आखरेचा श्वास घेतला. हरिभाऊ जावळे यांचा जन्म दि.१ जून १९५३ रोजी यावल तालुक्यातील भालोद येथे झाला होता. त्यांचं शिक्षण विज्ञान पदवीधर पर्यंत झालं होता. जनसंघ यामध्ये आधीपासूनच ते सक्रिय होते. १९९९ ते २००४ मध्ये त्यांनी यावल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आणि २००९ मध्ये पंधराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून गेले होते. यावेळी सलग दोन वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad