राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 'मातोश्री' वर जावून ठाकरे-पाटणकर कुटूंबीयांची भेट घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी तथा दैनिक 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांना दि.१५ जून रोजी पितृशोक झाला.त्या अनुषंगाने ठाकरे व पाटणकर कुटूंबायाचे सांत्वनासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मातोश्री जावून सांत्वन केले.
प्रसिद्ध उद्योजक माधव पाटणकर यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.मुंबईत अंधेरी येथील क्रिटी केअर रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. माधव पाटणकर यांची तब्येत काही दिवसा पासून व्यवस्थित नव्हती.त्यामुळे त्यांना रूग्णालयात भर्ती करण्यात आले मात्र सोमवारी पाटणकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मातोश्री वर रश्मी ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे या सदस्यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.रश्मी ठाकरे यांचे वडिल आणि उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांचे दि.१५ जून रोजी मुंबईत निधन झाले होते. राज्यपाल कोश्यारी यांनी दि.१५ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ठाकरे आणि पाटणकर कुटूंबायांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले होते.
