सकाळी उठताच या गोष्टी पाहणं टाळा आणि संकट व अडचणी टाळा !

 

वास्तुशास्त्रानुसार सकाळची सुरुवात ही संपूर्ण दिवसाच्या मानसिकतेवर, ऊर्जेवर आणि कामाच्या प्रवाहावर प्रभाव टाकणारी असते. झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा दिसणाऱ्या गोष्टींचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि विचारांवर होतो, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. त्यामुळे सकाळी उठताच कोणत्या गोष्टी पाहाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, याला विशेष महत्त्व दिले जाते.

वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र असून मानवी जीवनात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर पहिल्या नजरेला फार महत्त्व असते. काही गोष्टी सकाळी उठताच पाहणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढून अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठताच स्वतःची सावली पाहणे टाळावे. अंथरुणातून उठल्यानंतर लगेच सावलीकडे पाहणे दिवसाची चांगली सुरुवात नसल्याचे मानले जाते. यामुळे जीवनात नकारात्मकता वाढते आणि मानसिक अस्थिरता निर्माण होऊ शकते.

तसेच, सकाळी तयार होताना किंवा घराबाहेर पडताना तुटलेला आरसा पाहणे अशुभ मानले जाते. तुटलेल्या आरशामुळे कामात अडथळे येतात आणि नियोजन बिघडते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

स्वयंपाकघरातील रात्रीची खरकटी किंवा न धुतलेली भांडी सकाळी उठताच पाहणेही शुभ मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तसेच दुःख आणि दारिद्र्य येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे उठल्यानंतर लगेच स्वयंपाकघर स्वच्छ असणे आवश्यक मानले जाते.

घरातील बंद घड्याळे देखील वास्तुदोष निर्माण करतात, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार राहूचा संबंध इलेक्ट्रॉनिक वस्तूंशी जोडला जातो. त्यामुळे बंद पडलेली घड्याळे किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात ठेवणे अशुभ ठरते. विशेषतः सकाळी उठल्यानंतर चुकूनही बंद घड्याळाकडे पाहू नये, कारण यामुळे जीवनात अडचणी वाढू शकतात.

देव-देवतांच्या तुटलेल्या मूर्ती सकाळी पाहणे किंवा त्यांना स्पर्श करणेही टाळावे. तुटलेल्या मूर्ती घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात, असे मानले जाते. त्यामुळे अशा मूर्ती पवित्र नदीत किंवा योग्य पद्धतीने विसर्जित कराव्यात, असा सल्ला दिला जातो.

[ ही माहिती विविध उपलब्ध स्रोत आणि मान्यतेवर आधारित सर्वसाधारण माहिती आहे. या माहितीच्या सत्यतेबाबत दावा नाही तसेच अंधश्रद्धेला प्रोत्साहन ही नाही.]


---------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने