भारत आणि चीन मधील वाद दिवसं-दिवस वाढत असताना तब्बल ४८ वर्षा नंतर दोन्ही देशातील सैनिकांमध्ये चकमक झाली आणि त्यात भारताचे एक अधिकारी व एकोणीस जवान शहीद झाल्याची घटना घडली.गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत एक भारतीय अधिकारी आणि एकोणीस जवान शहीद झाल्याची माहिती आहे.
दि.६ मे पासून भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव सुरू आहे. अशात तणाव निवळण्यासाठी मध्यंतरी चर्चा देखील करण्यात आली. मात्र त्या चर्चेला यश न आल्याचे घटनेवरून दिसून येत आहे.गलवान खोऱ्यात चीनने तंबू ठोकले आहेत. दोन्ही बाजूंनी सैन्य तणाव वाढत आहे.
या घटनेनंतर दोन्ही बाजुच्या सैन्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.दरम्यान, सुत्रांच्या माहिती नुसार दोन्ही बाजुंनी गोळीबार झाली नाही. झटापटीत ही जीवितहानी झाल्याचे बोलल्या जात आहे.भारत आणि चीन या दोन्ही देशात १९७२ व १९७५ मध्ये गोळीबार झाला होता.मात्र ४८ वर्षा नंतर गलवान खोऱ्यात भारतीय अधिकारी आणि जवानावर मध्ये झटापटी झाल्याने तब्बल वीस भारतीय सैनिक शहीद झाले असून तेवढेच सैनिक चीनचे सुध्दा शाहिद झाले आहे.