Breaking

Post Top Ad

बुधवार, २४ जून, २०२०

भाजपच्या या आमदारांने केले वादग्रस्त वक्तव्य


भाजपच्या या आमदारांने केले वादग्रस्त वक्तव्य
सध्या जगभरात कोरोना मुळे नागरिक संकटाचा सामना करित असताना  निव्वळ चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करित असल्याचे समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. पवारांनी नेहमी बहुजन समाजावर अन्याय केला असल्याचा वादग्रस्त वक्तव्य भाजप च्या आमदाराने केल्याने मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.

राष्ट्रवादी चा भाजप आमदार पडळकरांना इशारा
धनगर समाज आणि आरक्षणावरून बोलतांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली त्यामुळे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांना "जरा तोंड सांभाळून बोलला तर बरं होईल,"अशा इशारा दिला असून भाजप आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेल्याचे चित्र आहेत.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, "शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं त्यांच मत आहे. गेल्या अनेक वर्षात राज्याचं नेतृत्त्व ते करत आले आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची पवार यांची भूमिका सातत्याने कायम राहिली आहे. ती ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे सकारात्मक विचाराधारा, अजेंडा, व्हिजन नाही. केवळ लहान घटकांतील भडकवून आपल्या बाजुने करून घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावर अन्याय करायचे अशी त्यांची भूमिका आहे." 

गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर कोण आहे?
गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्हातील आटपाटी तालुक्यातील पडळकरवाडी त्यांचे गाव असून धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणुन ओळखले जातात. विशेष म्हणजे ते नेहमी वादग्रस्त वक्तव्य करण्यात पुढे असतात. संघ, भिडे गुरुजी आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासु म्हणुन त्यांची ओळख आहेत. शिवसेना, वंचित अपक्ष आणि आता भाजप अशा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहेत. विधान परिषदेच्या माध्यमातून पडळकर यांना आमदारकी मिळाली आहे.
"शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणा बदल कधीही सकारात्मक राहिले नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. तात्कालीन फडणवीस सरकारने एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज ची घोषणा केली होती. पण सरकार गेल्याने तात्कालीन सरकारला कारवाई करता आली नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारने एक रूपयाही दिला नाही. त्यामध्ये पाच वस्तीगृह आहेत. एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी आणि घरांसंबंधी निर्णय आहेत. विधान परिषदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर यावर चर्चा करू," असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad