Breaking

Post Top Ad

बुधवार, २४ जून, २०२०

फिट अॅड हिट राहण्यासाठी चालवा सायकल


फिट अॅड हिट राहण्यासाठी चालवा सायकल
आर्णी,जि.यवतमाळ येथील सायकलिंग क्लब
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या पैकी अनेक जण शरीराकडे दुर्लक्ष करून विविध कामा मागे धावताना दिसून येते. त्यामुळे मानवी 'ताण' नानाविध व्याधींना ग्रासले जात आहेत. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अगदी साधा उपाय आहेत. ते म्हणजे गरिबांची 'बुलेट' (सायकल.) सायकल हा विषय सर्वांन साठी नविन नाही, मात्र आज आपण सगळेच जण सायकल कडे दुर्लक्ष केलंय ते महागड्या दुचाकी मुळे मात्र दुचाकी आपल्या शरीरा किती घातक आहेत, हे अनेक घटना वरून पुढे आले आहे. दररोज सायकल चालवल्यांने त्याचा फायदा आपल्याला कशा होतो हे आज आपण जाणुन घेणार आहोत.
चेतन शर्मा- रंदोनर्स क्लब,वाशिम
सायकल चालवण्यामध्ये खुप मेहनत करावी लागते, परंतु हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानले जाते. जर रोज 20 मिनिट सायकल चालवली तर अनेक आरोग्य समस्या कंट्रोल केल्या जाऊ शकतात. ही फिट राहण्यासाठी खुप सोपी पध्दत आहे.  20 मिनिट सायकिलिंग केल्याने  सायकिलिंगचे फायदे. इम्युनिटी सिस्टम बिल्ड होते. हेल्थी हार्ट  ब्लड सर्कुलेशन सुधारल्या जाते त्या मुळे हार्ट ला जाऊंन मिळणाऱ्या रक्त वाहिनियाँ सुरलित काम करतात, उत्तम साधन दैनंदिन कामासाठी , प्रदूषण रहित साधन, पैशाची बचत उत्तम साधन सोशल डिस्टनसिंग पालनया साठी, चर्बी कमी होते, ब्रेन पावर पन वाढतो. निसर्गशी जवलिक साधली जाते. 

हरिओमसिंह बघेल-माजी अध्यक्ष सायकलिंग क्लब आर्णी,यवतमाळ
9923406377
सायकल ला प्रोत्साहन देण्याची गरज सायकल कडे पाहन्याचा दृष्टीकोन आपल्याला बदलने गरजेचा आहे. आपन रोजची नियमित कामे करताना यात सायकल कसी वापरता येईल हा विचार करने गरजेचा आहे. यात आपले अनेक फायदे आहेत. इंधन बचत, प्रदूषन, होनार नाही, पैसे वाचतील पर्यावरनाला याचा फायदा होईल,  सोबत आपले शरीर स्वस्थ व निरोगी राहील,हे सर्वात महत्वाचे आहे. यासाठी आपन सायकल चालवन्याची सुरवात करायला पाहीजे. कोविड 19 च्या साथीपासून तर सायकल चे महत्व वाढले आहे, सोशल डीस्टंसिंग पाळायचे असेल, सुरक्षित प्रवास,यासाठी सायकल वापरने, हा चांगला पर्याय आहे, कोविड मुळे जिममध्ये जावून तुम्ही व्याआम करु शकत नाही सोशल डीस्टंस पाळता येत नाही, अशावेळी सायकल चालवने हाच चांगला पर्याय आहे. हे सहज शक्य आहे याकडे आता लोक वळत आहेत ही आनंदाची बाब आहे.

   हिमांशू त्यागी-हरियाणा
गेल्या  वर्षांपासून मी महाराष्ट्रातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. मी व्यावसायिक सायकलपटू आणि असोसिएशनच्या नावाखाली (मिशन ओलंपिक अमरावती) प्रशिक्षक आहे.  मी गेल्या चार वर्षांत एमटीबीच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे विदर्भ (अमरावती) भागातील एकमेव रायडर आहे. सरावाने 6 महिन्यांच्या आत (हळदवणी) उत्तराखंड येथे आयोजित एमटीबी राष्ट्रीय स्पर्धेत माझे विद्यार्थीही निवडले जातात. यावर्षी आम्ही महाराष्ट्रासाठी पहिले सुवर्णपदक मिळण्याची आशा बाळगत आहोत. माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनातून फिट राहण्यासाठी आणि निरोगी रूढी जगण्याचा उत्तम पर्याय म्हणजे सायकलिंग. मी असे म्हणत नाही कारण मी, व्यावसायिक सायकल चालक आहे परंतु जगभरातील संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. आपल्या मनामध्ये दररोज सकारात्मकतेची नवीन शक्ती तयार करण्यात मदत करते. आपले हृदय चांगल्या स्थितीत ठेवण्यास देखील मदत करते.आपण  आपले वजन सहजपणे कमी करू  शकतो आणि आपल्याला सायकलिंगपेक्षा भरपूर खाणे आवडत असल्यास आपल्या शरीरासाठी सर्वोत्कृष्ट उतारा आहे. सायकल चालवण्याबद्दल मला आवडलेला महत्त्वाचा आणि मनोरंजक भाग म्हणजे तो लोकांना आपल्याशी जोडण्यास मदत करतो. त्याचे कारण अधिक आहे परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे आपले शरीर मानसिक आणि शारीरिकरित्या बरे करण्यास मदत करते. जर तुम्हाला असे वाटत नसेल तर फक्त एका प्रवासासाठी माझ्याबरोबर सामील व्हा,आणि तुम्हाला त्यातील फरक जाणवू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad